आरोग्य शाखांची महाविद्यालये सुरू करा

आरोग्य विद्यापीठातील कार्यक्र मात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सूचना

आरोग्य विद्यापीठातील कार्यक्र मात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सूचना

नाशिक : करोनाकाळात वेगवेगळ्या विद्याशाखांनी एकत्रित केलेले काम   हे वाखाणण्यासारखे आहे. परंतु, अशा महामारीला तोंड देण्यासाठी आरोग्य क्षेत्रात संशोधनाला चालना मिळणे गरजेचे आहे. विद्यापीठाच्या आवारात आरोग्य शाखांची महाविद्यालये सुरू करावीत, अशी सूचना विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी के ली.

मंगळवारी येथे विद्यापीठाच्या नूतनीकरण के लेल्या प्रशासकीय इमारतीचे आणि सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते झाले. विद्यापीठ आवारातील शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीच्या धन्वंतरी सभागृहात झालेल्या कार्यक्र मात मार्गदर्शन करताना राज्यपाल कोश्यारी  बोलत होते.

विद्यापीठाच्या आवारात वैद्यकीय, आयुर्वेद, होमिओपॅथी आदी विद्याशाखांची महाविद्यालये सुरू करण्यासाठी आपला सकारात्मक प्रतिसाद राहील, असे सांगितले. विद्यापीठाने सुरू के लेला सौरऊर्जा प्रकल्प पर्यावरणपूरक असल्याचे याचा सर्वांनी आदर्श घ्यावा, असे आवाहनही त्यांनी के ले.

सर्वजण परीक्षा नको म्हणत असताना वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी विद्यापीठाच्या परीक्षा घेण्याचे धाडस दाखविल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे कौतुक के ले. यावेळी  पालकमंत्री छगन भुजबळ यांनी विद्यापीठात शिक्षणाबरोबर संशोधन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त के ली. विद्यापीठ परिसरात विविध आरोग्य विद्याशाखांची महाविद्यालये सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकने जागा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना भुजबळ यांनी के ली.

करोना आजाराच्या परिस्थितीत आलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि संबंधित विभागाने लक्ष देण्यासही त्यांनी सांगितले.

विद्यापीठाचे प्रति—कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी करोना महामारी काळात विद्यापीठाने के लेल्या कामाची स्तुती के ली. करोना महामारीत आरोग्य शाखेच्या विद्यार्थ्यांंची परीक्षा घेताना विद्यापीठाने कोविड सुरक्षा कवच योजना सुरू केली. वैद्यकीय शाखेबरोबर आयुर्वेद, होमिओपॅथी, योगा, सिद्ध आदी विद्याशाखांनी एकत्र येऊन महत्त्वपूर्ण लढा दिल्याचे नमूद के ले.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी प्रास्ताविकात महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत सर्व केंद्रीय परिषदा आणि संबंधित प्राधिकरणांकडे पाठपुरावा करूनच परीक्षा घेण्यात आल्याचे सांगितले. परीक्षा घेऊन विक्रमी वेळेत निकालही

जाहीर करण्यात आले. आरोग्य विज्ञानाच्या सर्वच शाखांमध्ये करोनावर दर्जेदार संशोधन व्हावे यासाठी विद्यापीठातर्फे विशेष संशोधन अनुदान उपलब्ध करण्यात आले आहे. करोना निवारणासाठी अधिक तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी अनेक दर्जेदार वैद्यकीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यापीठातर्फे यावर्षीपासून सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले. विद्यापीठाचे प्रति—कुलगुरू डॉ. मोहन खामगांवर यांनी विद्यापीठ अहवाल मांडला.

यावेळी विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, वैद्यकीय शिक्षण औषध संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने हेही उपस्थित होते. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल तोरणे यांनी केले. आभार कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी मानले.