इंधन दरवाढीविषयी रोहित पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार, म्हणाले……

दोन दिवस इंधनांचे दर स्थिर राहिल्याबद्दल रोहित पवार यांनी सरकारचे आभार मानले आहेत

देशातल्या अनेक राज्यांमध्ये पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. बरं, या दरांमध्ये घट तर होत नाहीच, मात्र त्यांच्यात दररोज वाढच होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस अक्षरशः त्रस्त झाला आहे. देशाच्या राजकारणात मात्र या विषयावरुन टीकाटिप्पणी करण्याचे कार्यक्रम सुरू आहेत.

हे वाचले का?  Rohit Pawar : “आचारसंहिता लागण्याआधी राज्यसेवा परीक्षेची जाहिरात काढा, अन्यथा…”, रोहित पवारांचा इशारा

इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरुन विरोधक आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. काही जण सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आहेत, तर काही ठिकाणी या दरवाढीविरोधात आंदोलनही सुरू आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही आता इंधन दरवाढीवरुन मोदी सरकारवर टीका केली आहे.


आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, महागाईच्या ओणव्यात आज सामान्य माणूस भाजून निघतोय, पण चक्क दोन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढले नाहीत. कदाचित आजपासून सुरू होणाऱ्या संसद अधिवेशनात टीकेची तीव्रता कमी व्हावी म्हणून ते स्थिर असावेत! पण काही का असेना… यामुळं केंद्र सरकारचे मानावे तेवढे आभार कमी आहेत!