इयत्ता नववी ते दहावीचे वर्ग शाळेत सुरू करण्यास परवानगी द्या

नेहमीच दुष्काळग्रस्त असणारे नाशिक जिल्ह्य़ाातील निऱ्हाळे हे टोकाचे गांव आहे.

नाशिक जिल्ह्य़ातील निऱ्हाळे येथील पालकांची मागणी

नाशिक : इयत्ता नववी आणि १० वीचे वर्ग शाळेत सुरु करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी निऱ्हाळे येथील माध्यमिक विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक साहेबराव कु टे यांनी के ली आहे. याबाबत शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर आणि संस्था अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे.

नेहमीच दुष्काळग्रस्त असणारे नाशिक जिल्ह्य़ाातील निऱ्हाळे हे टोकाचे गांव आहे. शेतीवर उपजिविका असणारा गरीब शेतकरी वर्ग तसेच मागासवर्गीय मजुरांची मुले या शाळेत येतात. ज्यांची परिस्थिती चांगली आहे अशा पालकांनी आपल्या मुलांना भ्रमणध्वनी उपलब्ध करून देऊन शाळेचा ऑनलाईन अभ्यास सुरु के ला आहे. परंतु, गरीब पालकांच्या मुलांना भ्रमणध्वनी नाही. ती मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत . या मुलांना शाळेत येऊन शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही. अशा मुलांसाठी शाळेत सर्व काळजी घेऊन वर्ग सुरु करण्याची मागणी अनेक पालकांकडून होत आहे.

हे वाचले का?  ११ हजार उच्चशिक्षित पोलीस भरतीच्या शर्यतीत….

शालेय समितीचे अध्यक्ष राजेंद्र वाघ आणि सर्व सदस्य यांनी ऑफलाईन वर्ग सुरु करावेत, अशी शिफारस केली आहे. याअगोदर हिवरे बाजार येथे शाळा सुरु करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर निऱ्हाळे शाळा सुरु करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे . मागील  करोनाच्या काळातही या शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी वाडी-वस्त्यांवर जाऊन गरिब मुलांना शिक्षण देण्याचे काम केले आहे. गरिबांची मुले शिकली पाहिजे, शिक्षणाच्या प्रवाहात ती टिकू न राहिली पाहिजे, यासाठी शाळेचे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक धडपड करीत असतात. शाळा बंद असतांना वाचनालय आपल्या दारी या उपक्रमातून आठवडय़ातुन एक शिक्षक वाचनालयाची पुस्तके  आपल्या गाडीवर घेऊन वाडी-वस्त्यावर जाऊन मुलांना वाटप करीत असत.

हे वाचले का?  IAS Puja Khedkar used OBC quota : कोट्यवधींची संपत्ती असलेल्या पूजा खेडकर यांनी MBBS चा प्रवेशही ओबीसी कोट्यातून घेतला

मुलांनी वाचलेल्या पुस्तकांचा अभिप्राय व्हॉटसअपवर द्यायचा, असा हा उपक्रम यशस्वीपणे राबविला गेला. करोना काळात दोन महिने शाळा सुरु होती. त्यावेळी इयत्ता १० वीचा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करून चार सराव परीक्षा घेण्यात आल्या होत्या. तसेच पाचवी ते १० वीच्या मुलांचे विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्यात प्रथम पाच मुलांचा सत्कार करण्यात आला होता. अशा पद्धतीने उपक्रमशील शाळा म्हणून ओळख असणाऱ्या या शाळेतील वर्ग सुरु करावे, अशी मागणी करणारी जिह्यतील ही पहिली शाळा आहे.