ईडीचा सर्वाधिक गैरवापर काँग्रेसच्या सत्ताकाळात झाला – देवेंद्र फडणवीस

ज्यांच्या बद्दल तक्रारी असतील पुरावे असतील त्यांची चौकशी होते

राज्य सरकारचा बांधकाम घोटाळा उघडकीस आणला आहे. त्यातील संबंधितांवर कारवाई व्हावी अशी भाजपची मागणी आहे तसेच ईडीचा सर्वाधिक गैरवापर काँग्रेस पक्षाच्या सत्ता काळात झाला आहे, त्यामुळे तुम्ही काही केले नाही तर घाबरता कशाला असा प्रश्न  माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.

ज्यांच्या बद्दल तक्रारी असतील पुरावे असतील त्यांची चौकशी होते.मात्र आपण काहि केले नाही तर घाबरण्याचे कारण काय? कोणतीही एजन्सी कोणावर थेट कारवाई करू शकत नाही.भाजपने कोणत्या ही चौकशी संस्थेचा गैरवापर केला नाही.काँग्रेसच्या काळातच तो अधिकचा झाला आहे.अशी टिका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सोमवारी कोल्हापूर हून आंबोली मार्गे गोव्याला  जात असताना काही काळ सावंतवाडी येथे थांबले होते. त्यावेळी त्यावेळी त्यांचे भाजपच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले.

हे वाचले का?  Maharashtra Assembly Election 2024: नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात निवडणुका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले सूतोवाच!

यावेळी आमदार रविंद्र चव्हाण, आमदार नितेश राणे,जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगराध्यक्ष संजू परब,अतुल काळसेकर,शहर अध्यक्ष अजय गोंदावळे,मनोज नाईक,उपसभापती शितल राऊळ,व पदाधिकारी यांनी त्यांचे स्वागत केले.

फडणवीस म्हणाले,बांधकाम क्षेत्रा बाबत राज्य सरकारने घेतलेला निर्णय हा चुकीचा आहे.यातील घोटाळे मी स्वत: उघडकीस आणले आहेत.त्याची  चौकशी करा अन्यथा मला उच्च न्यायालयात जावे लागेल. असा इशाराही त्यांनी दिला तसेच कोकणातील शेतकऱ्यांना सरकारने कोणतीही मदत केली नाही. मी अनेकांशी बोललो आहे. त्यांनीही अशी कोणतीही मदत आली नसल्याचे सांगितले. काँग्रेसने ईडी व भाजपचे कार्यालये एकत्र केली पाहिजेत अशी टिका केली होती. त्यावर फडणवीस म्हणाले, काँग्रेसच्या काळात सर्वात जास्त  चौकशी एजन्सीचा गैरवापर झाला होता.त् यामुळे ते आता भाजपवर आरोप करत आहेत. मात्र ज्यांची चौकशी होणार आहेत. त्याबाबतचे पुरावे असतील  तक्रारी असतील तर चौकशी होते. जर आपण काहिच केले नाही तर घाबरण्याचे कारण काय असा सवाल फडणवीस यांनी केला तसेच दोषी नसतील तर कोणतीही एजन्सी कोणावर थेट कारवाई करू शकत नाही. असे ते म्हणाले.

हे वाचले का?  Nana Patole : “काँग्रेसमध्ये नानाभाऊ-विजयभाऊ; एकमेकांना फाडून खाऊ अशी स्थिती”, जुन्या सहकाऱ्याची बोचरी टीका