उत्तर कोरियाने जपानवरुन क्षेपणास्त्र डागले; नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचा सल्ला

North Korea Fires Missile Japan : उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. त्यानंतर जपापने नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्यासाठी सांगितलं आहे.

जपान आणि उत्तर कोरियामध्ये मोठी घडामोड समोर येत आहे. उत्तर कोरियाने जपानवरुन क्षेपणास्त्र डागले आहे. त्यानंतर जपानमध्ये एकच खळबळ उडाली आहे. जपान सरकारने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच, नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याच्या सुचना केल्या आहेत.

हे वाचले का?  मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल नायजेरियातील मराठी भाषिकांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार

मंगळवारी जपानच्या क्षेत्रात असलेल्या प्रशांत महासागरात सकाळी ७ वाजून ४४ मिनिटांनी क्षेपणास्त्र पडले आहे. त्यानंतर सरकारने जपानच्या उत्तरेकडील होक्कइडो बेट आणि ईशान्येकडील आओमोरी प्रांतातील रहिवाशांना इमारतीमध्ये राहण्याचे आवाहन केले.

तर, दक्षिण कोरियाच्या लष्कराने सांगितले की, उत्तर कोरियाने उत्तरेकडील जगांग प्रांतातील मुप्योंग-री येथून पूर्वेकडे हे क्षेपणास्त्र डागले. दरम्यान, मागील आठवड्यात अमेरिका आणि दक्षिण कोरियाने संयुक्तरित्या लष्करी कवायती घेतल्या होत्या. त्याविरोधात उत्तर कोरियाने शनिवारी क्षेपणास्त्रे डागली होती. एएनआयने याबाबत वृत्त दिलं आहे.