एसटी संप:”…हे असले प्रकार राज्य सरकार करत आहे”; राज्यपालांच्या भेटीनंतर गोपीचंद पडळकरांची टीका

एसटी कामगारांच्या प्रश्नाकडे राज्य सरकार गांभीर्याने बघत नाही, अशी टीकाही पडळकर यांनी केली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी आज भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत असल्याने महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे. जेणेकरुन एसटीची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत मिळेल यासह अन्य महत्त्वाच्या मागण्यांसाठी एसटीतील १७ कामगार संघटनांच्या कृती समितीने बेमुदत संप केला आहे. यासंदर्भात या भेटीदरम्यान चर्चा झाली.

हे वाचले का?  Maharashtra Assembly Election 2024: नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात निवडणुका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले सूतोवाच!

एसटी कर्मचाऱ्यांसह आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. पडळकर यांच्यासोबतच वकील गुणरत्न सदावर्ते हे देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना पडळकर म्हणाले, “एसटी कामगारांच्या प्रश्नाकडे सरकार गांभीर्याने बघत नाही. जवळपास ३६ एसटी कामगारांनी आत्महत्या केलेल्या आहेत. काल तर अक्कलकोटमधून जी खासगी गाडी भरली, ती सोलापूरकडे जाताना गाडीचा अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू झाला”.
https://84f69a89809b9fdbb0bca4c420d04e1f.safeframe.googlesyndication.com/safeframe/1-0-38/html/container.html

राज्यपालांच्या भेटीबद्दल सांगताना पडळकर म्हणाले, “या संपातून मार्ग काढण्याऐवजी या संपात फूट कशी पडेल, कर्मचाऱ्यांच्या मध्ये भीतीचं वातावरण कसं निर्माण होईल, कर्मचाऱ्यांना निलंबनाच्या नोटिसा देणं, सेवासमाप्तीच्या धमक्या देणं असले प्रकार राज्य सरकारच्या माध्यमातून होत आहेत. म्हणून आम्ही राज्यपालांना भेटलो. या शिष्टमंडळामध्ये सदाभाऊ खोत, ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, ऍडव्होकेट जयश्री पाटील आणि पाच महिला कर्मचारी आम्ही राज्यपालांची भेट घेतली आहे आणि आम्ही त्यांना विनंती केली की संबंधित मंत्री आणि पदाधिकाऱ्यांकडून माहिती घ्या की काय पद्धतीने काम चालू आहे, इतके दिवस संप चालू असताना हे सरकार काय करत आहे? अशी मागणी केली आहे”.

हे वाचले का?  Badlapur School Crime Case Live Updates: बदलापुरात दोन चिमुकल्यांवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी!