ऑनलाइन वितरण प्रणाली विकसित होण्याच्या मार्गावर

मात्र राज्यभरात स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करून प्रत्येक टप्पा हा ऑनलाइन पद्धतीने अंतर्भूत केला जात आहे.

दिरंगाईमुळे धान्य वितरण रखडले

पालघर : राज्यात प्राधान्य व अंत्योदय रेशन कार्डधारकांना रास्त दराने धान्य देण्याच्या दुकानांची प्रणाली ऑनलाइन करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने विद्यमान महिन्यात संबंधित स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्याचा साठा येऊन पोहोचला असला तरी त्याचे प्रत्यक्ष वितरण सुरू झाले नाही. ऑनलाइन पद्धतीमध्ये सुधारणा प्रक्रिया काही दिवसांत पूर्ण होऊन लाभार्थ्यांना धान्यपुरवठा सुरू होईल, असे पुरवठा विभागाने सांगितले आहे.

सध्याच्या प्रणालीमध्ये स्वस्त धान्य वितरण व्यवस्था ‘पॉस मशीन’च्या माध्यमातून होत असून लाभार्थ्याला त्याच्या वाट्याचे धान्य मिळाल्यानंतर त्याची ऑनलाइन नोंद असते. मात्र राज्यभरात स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करून प्रत्येक टप्पा हा ऑनलाइन पद्धतीने अंतर्भूत केला जात आहे. नवीन सॉफ्टवेअर तसेच कर्मचाऱ्यांना या नवीन पद्धतीची सवय नसल्याने कार्यप्रणाली कार्यरत होण्यास अवधी लागत आहे. पालघर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना येत्या काही दिवसांत त्यांचा महिन्याचा स्वस्त पुरवठा उपलब्ध होईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी संजय अहिरे यांनी लोकसत्ताला सांगितले.

हे वाचले का?  सांगली : नागरी वस्तीत पूराचे पाणी शिरल्याने १७ जणांचे स्थलांतर

पालघर जिल्ह्यात १०८२ स्वस्त धान्य दुकाने असून १४ लाख ५२ हजार प्राधान्य कार्डधारक तर ९९ हजार ३८८ अंत्योदय कार्डधारक आहेत. पालघर जिल्ह्यात सुमारे ६७ हजार क्विंटल तांदूळ तर ३८ हजार क्विंटल गव्हाचे वितरण केले जात आहे.

कशी आहे नवीन वितरण प्रणाली?

जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यामार्फत महिन्याचे मागणीपत्र तयार करणे, त्याला रिलीज ऑर्डरमार्फत मान्यता देणे, वर्क ऑर्डर अर्थात काम करण्याचा परवाना देणे व खरेदी करण्यासाठी आदेश काढण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

हे वाचले का?  Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेचा निधी सरकारनं थांबवला, नवे अर्जही स्वीकारणं बंद; नेमकं कारण काय?

अन्नधान्य साठवण्याच्या गोडाऊनमधून धान्य वाहतूक करणाऱ्या ट्रकचे चलान काढण्याची जबाबदारी लिफ्टिंग ऑफिसरवर देण्यात आली असून धान्यपुरवठा डेपोच्या अधिकाऱ्यांमार्फत साठा पावती तयार करण्यात येणार आहे.

हे धान्य तालुका स्तरावर पोहोचल्यानंतर त्याची देयके अदा करण्यात येऊन तालुका पुरवठा अधिकाऱ्यांमार्फत विविध वितरण केंद्रांमध्ये व स्वस्त धान्य दुकानांमध्ये हे धान्य पोहोचविल्यानंतरच पॉस मशीनवर वितरणासाठी साठा उपलब्ध होणार आहे.

हे वाचले का?  ‘आनंदाचा शिधा’ योजनेत पारदर्शकता; ठराविक ठेकेदारांची मक्तेदारी संपुष्टात; ठेका मिळविण्यासाठी नऊ कंपन्या स्पर्धेत