कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धा : रिदम-विजयवीरकडून ‘सुवर्णदशकपूर्ती’

रिदम-विजयवीर जोडीने अंतिम सामन्यात थायलंडच्या कॅनयाकॉर्न हिरूनफोइम आणि श्वॅकोन ट्रिनीफॅक्रोन जोडीवर ९-१ असा दिमाखदार विजय मिळवून भारताला १०वे सुवर्णपदक जिंकून दिले.

रिदम सांगवान आणि विजयवीर सिद्धू या भारतीय जोडीने ‘आयएसएसएफ’ कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धेच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताच्या खात्यावरील २३व्या पदकाची नोंद केली.

हे वाचले का?  ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या जन्मगावी क्रीडा संकुलासाठी अखेर २५.७५ कोटींचा निधी मंजूर

रिदम-विजयवीर जोडीने अंतिम सामन्यात थायलंडच्या कॅनयाकॉर्न हिरूनफोइम आणि श्वॅकोन ट्रिनीफॅक्रोन जोडीवर ९-१ असा दिमाखदार विजय मिळवून भारताला १०वे सुवर्णपदक जिंकून दिले. याच प्रकारात तेजस्वनी आणि अनिश भानवाला जोडीने थायलंडच्या शॅविसा पॅडुका आणि रॅम खाम्हाइंग जोडीला १०-८ असे नमवून कांस्यपदक मिळवले.https://dd69a414bacd84600e08b5a998b21ee9.safeframe.googlesyndication.com/safeframe/1-0-38/html/container.html

महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात प्रसिद्धी महत, निश्चल आणि आयुशी पॉडर या त्रिकुटाने रौप्यपदकाची कमाई केली. अंतिम लढतीत अमेरिकेच्या एलिझाबेझ मॅक्घिन, लॉरेन झॉन आणि कॅरोलिन टकर या त्रिकुटाने भारताला ४७-४३ अशा फरकाने हरवले.