करवीर निवासिनी महालक्ष्मीची मूर्ती सुस्थितीत, तज्ज्ञांचा निर्वाळा

“मूर्तीची कोणतीही झीज झालेली नाही”

कोल्हापुरातील करवीर निवासिनी महालक्ष्मीची मूर्ती सुस्थितीत असून मूर्तीची कोणतीही झीज झाली नाही. तथापि श्री महाकाली व श्री महासरस्वती मूर्तीची झीज झाल्याने संरक्षणाकरिता दोन्ही मूर्तीचे रासायनिक जतन प्रक्रिया करणे आवश्यक आहे, असे मत सोमवारी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरात सोमवारी औरंगाबाद येथील भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. पुरातत्व रसायन तज्ञ उपअधीक्षक श्रीकांत मिश्रा, सुधीर वाघ, सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग पुणे येथील विलास वाहने, उपअधीक्षक उत्तम कांबळे यांनी मूर्तीची पाहणी केली. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सचिव विजय पवार, वास्तुविशारद अमरजा निंबाळकर, उमाकांत राणींगा,गणेश नेर्लेकर, प्रसन्न मालेकर उपस्थित होते.

हे वाचले का?  सांगली जिल्ह्यातील ७९ गावांत ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम, यावर्षी नव्या २२ गावांची भर

संपूर्ण मंदिरामध्ये काही प्रमाणात कार्बनचा थर दिसत आहे. तो काढून मंदिर स्वच्छ करून घेण्याची ची आवश्यकता असल्याचे विलास वाहणे यांनी सूचित केले. मंदिरावरील छतावरील कोब्याच्या थराची पाहणी केल्यानंतर हे काम जोखमीचे आहे. सखोल अभ्यास करून आवश्यक तपासण्या करून याबाबत निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

हे वाचले का?  Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk 2024 LIVE : लालबागच्या राजाचं विसर्जन, निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावले