करोनाकाळात ‘एक गाव एक गणपती’ उपक्रमासाठी जनजागृती

करोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन ग्रामीण भागात ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रमासाठी पोलिसांकडून जनजागृती केली जात आहे.

सटाणा पोलीस ठाण्यातर्फे शांतता समितीच्या बैठकीत पोलिसांचे आवाहन

नाशिक : करोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन ग्रामीण भागात ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रमासाठी पोलिसांकडून जनजागृती केली जात आहे. करोनाच्या संकटात ‘एक गाव एक गणपती’ची स्थापना करून आदर्श घालून द्यावा. इतर अनावश्यक खर्चाला फाटा देत रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर सटाणा पोलीस ठाण्याच्या वतीने पंचायत समितीच्या सभागृहात उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत िशदे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यात शहरातील आणि ग्रामीण भागातील राजकीय पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, गणेश मंडळांचे पदाधिकारी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी िशदे, निरीक्षक सुभाष अनमोलवार, नायब तहसीलदार नेरकर, पालिकेचे प्रशासकीय अधिकारी विजय देवरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

हे वाचले का?  महामार्ग काँक्रिटीकरणासाठी नाशिक शहरातील वाहतुकीवर निर्बंध

करोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. इतर जिल्ह्यात करोना रुग्णांची आकडेवारी वाढत चालली आहे. हा धोका लक्षात घेता सटाणा तालुक्यात एक गाव एक गणपतीची स्थापना करावी आणि अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहन िशदे यांनी केले. सटाणा शहराची ओळख इतर शहरांपेक्षा वेगळी आहे. करोनाकाळात सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. सार्वजनिक मंडळांनी रक्तदान शिबीर घेऊन रक्तपेढय़ांना रक्त उपलब्ध करून द्यावे. यामुळे अनेकांचे प्राण वाचतील, अशी अपेक्षा िशदे यांनी गणेश मंडळांकडे व्यक्त केली.

घरगुती गणपती मूर्तीचे नदीपात्रात विसर्जन न करता विसर्जन कुंड तयार करून त्यात विसर्जन करावे. यामुळे नदीपात्रात होणारे प्रदूषण टळेल. मंडळांनी एक गाव एक गणपतीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करून करोनाची परिस्थिती पाहता नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा, गणपती बाप्पा स्थापनेच्या दिवशी आणि विसर्जनाच्या दिवशी कोणतेही वाद्य वाजविता येणार नाही, अशा सूचना पोलीस निरीक्षक अनमोलवार यांनी केली.

हे वाचले का?  देवळालीत तोफगोळ्याचा स्फोट, लष्कराकडून चौकशीचे आदेश

मंडळांकडून प्रतिसाद

‘एक गाव एक गणपती’ हा निर्णय चांगला आहे. मंडळांनी यावर विचार करावा आणि ही संकल्पना अमलात आणून करोना संसर्ग शहरात पसरणार नाही, याची काळजी घ्यावी असे आवाहन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, माजी नगरसेवक अरिवद सोनवणे, मनसेचे शहराध्यक्ष पंकज सोनवणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम यांनी केले. काही मंडळांनी ‘एक गाव एक गणपती’ला सहमती दिली. नियमांचे पालन करीत आमचे मंडळ विविध उपक्रम राबवीत गणपती उत्सव साजरा करेन असे जय भद्रा गणपती मंडळाचे अध्यक्ष मंगेश खैरनार यांनी सांगितले. शहरातील मोठय़ा मंडळांच्या अध्यक्षांनी या वर्षी गणपती न बसविण्याचा निर्णय घेतला असल्याचे बैठकीत जाहीर केले.

हे वाचले का?  पैसे दामदुपटीच्या आमिषाने दोनशे कोटी रुपयांना फसवणूक, लासलगाव पोलिसांत गुन्हा