करोनापेक्षाही देशाची करूणा प्रभावी – राज्यपाल

यापुढेही सर्वांनी आपल्या कर्तव्याचे पालन करून देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी कार्य करावे

भारत ही समर्पणाची भूमी आहे. समाजाच्या सेवेसाठी सर्वकाही समर्पित करण्याची आपल्या महान देशाची परंपरा आहे. तीच परंपरा आज करोना सारख्या महामारीच्या काळात डॉक्टर, आरोग्य सेवक, पोलीस, स्वच्छता कर्मचारी अशा लहान मोठय़ा प्रत्येक करोना योध्दयाने निभावून सर्वोच्च सेवा कार्य केले. करोनापेक्षाही देशाची करुणा प्रभावी ठरली. यापुढेही सर्वांनी आपल्या कर्तव्याचे पालन करून देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी कार्य करावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरूवारी धुळ्यात केले.

हे वाचले का?  क्रीडाक्षेत्रातील यश देशाच्या प्रगतीचे सूचक! बुद्धिबळपटूंशी भेटीदरम्यान पंतप्रधानांची विविध विषयांवर चर्चा

राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते महापालिकेत करोना योध्दांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राज्यपालांनी मार्गदर्शन केले. यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, आमदार फारुक शाह, धुळ्याचे महापौर चंद्रकांत सोनार हे मंचावर उपस्थित होते.

धुळे जिल्ह्यला करोनाच्या संकटातून यशस्वीपणे बाहेर काढणासाठी महत्वाची भूमिका पार पाडल्याबद्दल जिल्हाधिकारी संजय यादव, धुळे महापालिकेचे आयुक्त अजिज शेख, हिरे वैद्यकिय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.पल्लवी सापळे, मनपा उपायुक्त गणेश गिरी, सहाय्यक उपायुक्त शांताराम गोसावी, मयत करोना रुग्णांच्या अंतविधीसाठी स्वत:ची जमीन उपलब्ध करुन देणारे प्रविण अग्रवाल, प्रविण पवार, विजय पवार, मृत कोरोना रुग्णाचा अंत्यविधी करणारे सचिन शेवतकर, रुग्णवाहिका चालक अन्सारी, आरोग्याधिकारी डॉ. महेश मोरे, सहाय्यक आरोग्य अधिकारी लक्ष्मण पाटील, चंद्रकांत जाधव यांचा सन्मान राज्यपालांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि मानचिन्ह देवून करण्यात आला. जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी दीपकांत वाघ, जिल्हा करोनाविषयक प्रमुख अधिकारी डॉ. विशाल पाटील, डॉ. अभय शिनकर, डॉ. मुकरम खान, दिवंगत डॉक्टर चुडामण पाटील आणि मयत पोलीस कर्मचारी यांच्या परिवारातील सदस्यांचाही सन्मान राज्यपालांच्या हस्ते करण्यात आला.

हे वाचले का?  J&K Budgam Bus Accident: BSF जवानांची बस दरीत कोसळून चार जवानांचा मृत्यू, २८ जखमी; जम्मू-काश्मीरच्या बडगावमधील दुर्दैवी घटना

खासदार डॉ.सुभाष भामरे, आमदार रावल यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक महापौर चंद्रकांत सोनार यांनी केले. आभार आयुक्त अजिज शेख यांनी मानले.