कांदा उत्पादकांतर्फे सोशल मीडियात आंदोलन

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी करताच या निर्णयास कांदा उत्पादकांसह विविध स्तरांतून तीव्र विरोध होत आहे. या निर्णयाविरोधातील भावना व्यक्त करण्यासाठी राज्यभरातील कांदा उत्पादकांच्या वतीने आता शनिवार (दि. १९)पासून सोशल मीडियाच्या माध्यमातून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून पुकारले जाणारे मोठे आंदोलन म्हणून जगभरात हे ओळखले जाईल, असा दावा कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या माध्यमातून हे आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भरत दिघोळे यांनी दिली. ते म्हणाले, की कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाद्वारे सरकारने शेतकरीविरोधी भूमिका अधोरेखित केली आहे. त्यामुळे संघटनेच्या नेतृत्वाखाली शनिवारपासून छेडण्यात येणाऱ्या सोशल मीडियातील या आंदोलनात लाखो शेतकरी सहभागी होणार आत्त. कांदा निर्यातबंदीस विरोध हा विषय घेऊन शनिवारी फेसबुक लाइव्ह, रविवारी व्हॉट्सअॅप मेसेज, सोमवारी व्टिटर आणि मंगळवारी इन्स्टाग्राम व यू ट्यूबच्या माध्यमातून हे आंदोलन छेडण्यात येणार आहे.

हे वाचले का?  पूर्व लडाखमध्ये सैन्यमाघारी पूर्ण, भारत-चीन सैनिकांमध्ये आज दिवाळीच्या मिठाईची देवाणघेवाण

रविवारी (दि. २०) हे कांदा उत्पादक शेतकरी आपापल्या मतदारसंघातील आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेत्यांना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मेसेज करून व्यथा मांडतील. सोमवारी (दि. २१) पंतप्रधान, केंद्रीय कृषिमंत्री व केंद्रीय वाणिज्यमंत्र्यांसह राज्याचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांना #justiceforonionfarmers हा हॅशटॅग वापरून कांदा उत्पादक व्टिटरव्दारे मोहीम उघडतील. मंगळवारी (दि. २२) रोजी इन्स्टाग्राम व यू ट्यूबच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकरी केंद्र सरकारकडे कांदा निर्यातबंदी उठविण्याची आग्रही मागणी करतील, असे संघटनेचे दिघोळे यांनी सांगितले.

हे वाचले का?  Ashok Chavan : ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेवरुन भाजपा आणि महायुतीतच एकमत नाही? ‘हे’ तीन नेते काय म्हणाले?