कानिफनाथ संजीवन समाधी दर्शनासाठी भाविकांची गर्दी; मढीच्या प्रसिद्ध गाढवांच्या बाजाराला यंदा प्रतिसाद कमी

‘भटक्यांची पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मढी (ता. पाथर्डी) येथील यात्रेनिमित्त भरलेल्या गाढवांच्या बाजारात यंदा कमी प्रतिसाद मिळाला.

नगर : ‘भटक्यांची पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मढी (ता. पाथर्डी) येथील यात्रेनिमित्त भरलेल्या गाढवांच्या बाजारात यंदा कमी प्रतिसाद मिळाला. काठेवाडी व गावरान जातीची अवघी १५० गाढवे विक्रीसाठी आली होती. परराज्यात मोठी मागणी असल्यामुळे व किंमतही चांगली मिळत असल्याने मढीच्या प्रसिद्ध बाजाराकडे विक्रेत्यांसह खरेदीदारांनीही पाठ फिरवली. मात्र कानिफनाथांच्या संजीवन समाधी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. 

रणरणते उन असूनही भाविक  कानिफनाथांचा जयजयकार करत मोठय़ा संख्येने मढीत दाखल झाले होते. गेली दोन वर्ष करोना प्रतिबंधांमुळे अनेक भाविकांना दर्शनाचा लाभ घेता आला नाही. यंदा करोना आटोक्यात आल्याने भाविकांची गर्दी वाढलेली होती. मात्र दर्शनाचा लाभ घेताना भाविकांना समाधीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागले. गाढवांच्या बाजारात आज विशेष आवक झाली नाही. काल, सोमवारी रात्रीपासूनच भाविकांची गडाकडे रीघ लागली होती. आज रात्रीपर्यंत गर्दीचा ओघ कायम होता. अस्तन्या घेऊन व वाहनाने आलेल्या भाविकांसाठी दुहेरी दर्शनबारी चालू असल्याने नाथांच्या समाधी दर्शनासाठी भाविक वेळ लागत नव्हता. मंदिराकडे येण्यासाठी एकेरी वाहतूक ठेवण्यात सुरू होती, मात्र ती सुरळीत करण्यासाठी पोलीस कर्मचारीच नसल्याने वाहतुकीची कोंडी झाली.https://980b80fd8d0d04733f2a93421772b400.safeframe.googlesyndication.com/safeframe/1-0-38/html/container.html

हे वाचले का?  Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा मतदारांवर किती परिणाम होईल? शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले…

दोन वर्षांच्या कालखंडानंतर रेवडीच्या बाजारात चांगली उलाढाल झाली. मात्र गाढवांच्या बाजारात काठेवाडी व गावरान मिळून अवघी १५० गाढवे आली होती. परराज्यात चांगल्या किमतीत मागणी असल्याने हा परिणाम झाल्याचे गाढवाचे व्यापारी इसाक गुलाब मदारी यांनी सांगितले. अनेक भाविक नाथांचे दर्शन घेऊन मायंबा, वृद्धेश्वर व मोहटे येथे गेल्याने या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. अनेक भाविक नाथांचे दर्शन घेऊन उद्या, बुधवारी पैठण येथे होणाऱ्या षष्टी यात्रेसाठी रवाना झाले.

हे वाचले का?  सातारा : डी. पी. जैन कंपनीस ३८ कोटी ६० लाखांचा दंड

वाहतूक कोंडी आणि पाकीटमारी  

भाविकांच्या अंगावरील दागिन्यांसह पाकीटचोरीचे पाथर्डी पोलिसांकडे पाच गुन्हे आज दाखल झाले. यात्रा बंदोबस्ताचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी मढीकडे न फिरकल्याने बंदोबस्तावरील पोलीस जागेवरच बसून होते. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन पाकीटमारीच्या अनेक घटना घडल्या.