काश्मीरमध्ये सहा दहशतवादी ठार; दोन जवान शहीद

जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यामध्ये शनिवारी दोन स्वतंत्र चकमकींमध्ये एकूण सहा दहशतवादी ठार झाले आणि दोन जवान शहीद झाले.

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यामध्ये शनिवारी दोन स्वतंत्र चकमकींमध्ये एकूण सहा दहशतवादी ठार झाले आणि दोन जवान शहीद झाले. तर मोडेग्राम येथील चकमकीत दोन दहशतवाद्यांचे मृतदेह आढळले तसेच चिन्निगम येथूनही चार दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत.

हे वाचले का?  क्रीडाक्षेत्रातील यश देशाच्या प्रगतीचे सूचक! बुद्धिबळपटूंशी भेटीदरम्यान पंतप्रधानांची विविध विषयांवर चर्चा

कुलगाम जिल्ह्यातील मोडेग्राम येथे शनिवारी दोन दहशतवादी ठार झाल्याची आणि एक जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली होती. या चकमकींबद्दल जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक आर आर स्वैन यांनी सांगितले की, ‘इतक्या संख्येने दहशतवादी ठार होणे हे मोठे यश आहे. नि:संशयपणे, सुरक्षेविषयी वातावरण मजबूत करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये हा एक मोठा टप्पा आहे.  संदेश देण्याच्या दृष्टीने हे यश अर्थपूर्ण आहे. दहशतवादाचा नि:पात करण्यासाठी या मोहिमेचे यश सूचक आहे.’