केम परिसरातील वनौषधींचा खजिना नामशेष होण्याच्या मार्गावर

महाराष्ट्र राज्याच्या सिमेलगत ‘दंडकारण्य‘ हे गुजरातचे राखीव जंगल आहे.

सततची वृक्षतोड चिंताजनक

नाशिक : जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वत रांगेत असलेला केम पर्वत परिसरात अनेक दुर्मिळ वनौषधींचा खजिना आहे. परंतु, सततची वृक्षतोड आणि अवैध पध्दतीने वनौषधी तोडून नेण्यात येत असल्याने सद्यस्थितीत वनौषधींचा हा खजिना नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सागवानाचीही अवैध पध्दतीने तोड के ली जात आहे.

महाराष्ट्र राज्याच्या सिमेलगत ‘दंडकारण्य‘ हे गुजरातचे राखीव जंगल आहे. या जंगलात गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या हद्दीत आजही थोड्याफार प्रमाणात दुर्मिळ वन औषधी वनस्पती आढळतात. महाराष्ट्र राज्याच्या सिमावर्ती करंजुल(क.), खुंटविहीर, पिंपळसोंड, उदालदरी, तातापाणी, हडकाईचोंड, रघतविहीर, कुकूडणे, गोंदुणे, मांधा, राशा, सुळे, बाफळून, भवाडा, राक्षसभुवन, करंजुल, खिर्डी,भाटी, खडकी, मधुरी या गावांच्या परिसरात दुर्मिळ वन औषधी आढळून येतात. पूर्वी वैद्यकीय सेवा गावोगावी पोहचलेल्या नसल्याने आदिवासी समाजातील वन औषधीचे जाणकार वैद्य हे पारंपरिक पद्धतीने काही आजारांवर उपचार करीत असत. हा आजीचा बटवा म्हणून ओळखला जाणारा वन औषधींचा खजिना आणि जंगलातील नैसर्गिक ठेवा असलेला रानमेवा बेसुमार वृक्षतोड तोडीमुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सततच्या वृक्षतोडीमुळे के वळ पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे असे नव्हे तर, महत्वाची वन औषधीही नष्ट होत आहे. ही वन औषधी जपल्यास आणि त्यांचे योग्य प्रकारे संवर्धन के ल्यास त्यापासून आदिवासींनी उत्पन्नही मिळू शकते. परंतु, त्यासाठी योग्य प्रकारे प्रयत्न होणे गरजेचे आहे.

हे वाचले का?  नाशिक जिल्ह्यात ‘एलडीओ’ नावाखाली डिझेलची अवैध विक्री; पेट्रोलपंप चालकांचा बंदचा इशारा

सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये कु ठेही वन औषधी आढळून येतात. वन औषधी सर्वांनाच ओळखता येतात असे नाही. वनस्पतींची अधिक माहिती असणाऱ्यांनाच त्याविषयी अधिक सांगता येते. दुर्गम भागात डॉक्टर लवकर उपलब्ध होणे अशक्य असते. अशावेळी एखाद्या आजारावर, जखमेवर तत्काळ उपाय म्हणून वन औषधींचा वापर के ला जातो. त्यामुळे या वन औषधींचे संवर्धन करणे आवश्यक झाले आहे. -दत्तात्रय चौधरी (पर्यावरणप्रेमी, पेठ)

हे वाचले का?  पुण्यातील फुलेवाडा प्रतिकृतीसाठी नाशिकमध्ये जागा – मुख्यमंत्री