खरी शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा? या प्रश्नावर उद्धव म्हणाले, “आम्हाला पुरावा द्यायची गरज नाही, निवडणुका येऊ दे…”

“अशाप्रकारची फूट याआधी राणे-भुजबळांनाही पाडता आली नव्हती. असं का घडलं?” या प्रश्नाचंही उद्धव यांनी उत्तर दिलं.

शिवसेनेत वर्चस्व कोणाचे आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हावर अधिकार कोणाचा, या दोन मुद्दय़ांवरील निवडणूक आयोगापुढील सुनावणीला शिवसेनेने आक्षेप घेतला आहे.  निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती देण्याची विनंती करणारा अर्ज शिवसेना मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार आहे. असं असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या विषयावरुन आम्हाला शिवसेनेसंदर्भात पुरावे देण्याची गरज नसून मतदारच बंडखोरांना निवडणुकीच्या रिंगात पुरुन टाकतील असा टोला लगावलाय. अत्यंत अनपेक्षितरीत्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लागल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रथमच जाहीर मुलाखतीद्वारे व्यक्त झाले आहेत. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे.

हे वाचले का?  गणेशोत्सवातून विधानसभेसाठी मोर्चेबांधणी; फलकबाजी, आरती संग्रह वितरण, ढोल-ताशा महोत्सव

“निवडणूक आयोगासमोर नवा खटला उभा राहतोय. तो म्हणजे धनुष्यबाण कोणाचा?” असा प्रश्न राऊत यांनी उद्धव ठाकरेंना विचारला. त्यावर उत्तर देताना उद्धव यांनी, “मला अजूनही देशाच्या घटनेवर, कायद्यावर विश्वास आहे. चोरीमारी सगळीकडे चालते असं माझं मत नाही. नाहीतर तुम्हाला सत्यमेव जयते हे वाक्य तुम्हाला पुसावं लागेल आणि दोन वाक्य करावी लागतील एकाची. एक तर असत्यमेव जयते आणि दुसरं सत्तामेव जयते. त्यामुळे सत्तामेव जयतेसमोर असत्य घेऊन तुम्ही जाणार असाल तर लोक ते मान्य नाही करणार,” असं म्हणाले.

हे वाचले का?  माजी आमदार राजन तेली यांचा भाजपा प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

पुढील प्रश्न विचारताना राऊत यांनी, “हे दुर्देव आहे महाराष्ट्र असं मला वाटतं पण आज अशी वेळ आणली आहे की ठाकरेंना पुरावे द्यावे लागतात की शिवसेना खरी किंवा खोटी,” असं म्हटलं. त्यावर माजी मुख्यमंत्र्यांनी, “लोक वाट बघतायत निवडणुकांची. आम्हाला पुरावा द्यायची गरज नाही. निवडणुका येऊ दे यांनाच पुरुन टाकतो असं लोक म्हणतायत. जनताच त्यांना राजकारणात पुरुन टाकेल,” असा विश्वास व्यक्त केला.

हे वाचले का?  “विशाळगडप्रकरणी मला जबाबदार धरल्याने…”; नेमकं काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?