खेलरत्नचे नामांतर

राजीव गांधी यांच्याऐवजी आता मेजर ध्यानचंद पुरस्कार

राजीव गांधी यांच्याऐवजी आता मेजर ध्यानचंद पुरस्कार

नवी दिल्ली : देशाच्या क्रीडाक्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराला शुक्रवारी मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्यात आले आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पुरुष आणि महिला संघाने केलेल्या कामगिरीमुळे राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे वाचले का?  Vinesh Phogat Hearing in CAS: विनेश फोगटला रौप्य पदक देता येणं शक्य नाही? IOC प्रमुखांचा स्पष्ट नकार, म्हणाले…

खेलरत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्याची देशातील नागरिकांनी आग्रही मागणी केली होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ‘‘देशातील नागरिकांच्या भावनांचा आदर करून यापुढे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखला जाईल. हॉकीच्या सुवर्णयुगाचे शिल्पकार ध्यानचंद यांनी भारताला या खेळात प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यामुळेच त्यांचे नाव या पुरस्काराला देण्यात आले आहे,’’ असे ‘ट्वीट’ मोदी यांनी केले.

हे वाचले का?  ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या जन्मगावी क्रीडा संकुलासाठी अखेर २५.७५ कोटींचा निधी मंजूर

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पुरुष संघाने कांस्यपदक पटकावले, तर महिला संघाला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. यामुळे संपूर्ण देशभरात हॉकीच्या लोकप्रियतेची लाट आली आहे. याच सकारात्मक ऊर्जेची फलश्रुती भविष्यात जाणवेल, असे मोदी यांनी सांगितले.