गुजरातमध्ये पाकिस्तानी बोटीतून २५० कोटींचे हेरॉइन जप्त; एटीएसची धडक कारवाई

गेल्या काही दिवसांपूर्वीच मुंब्रा बंदरातून ५०० किलोंचे कोकेन जप्त करण्यात आले होते.

गेल्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये एटीएसकडून अंमली पदार्थांविरोधात कारवाई करण्यात येत आहे. पुन्हा एकदा एटीएस (ATS) ने गुजरातमधील कच्छमधून एका पाकिस्तानी बोटीतून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त केले आहे. बीएसएफ (BSF) च्या मदतीने एटीएसने ही कारवाई केली आहे.

हे वाचले का?  Drishti IAS Institute : विकास दिव्यकीर्तींच्या दृष्टी IAS इन्स्टिट्युटवर कारवाई, महापालिकेने लावलं सील; कारण काय?

मुंब्रा बंदरातून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त

गेल्या काही दिवसांपूर्वीच मुंब्रा बंदरातून ५०० किलोंचे कोकेन (cocaine) जप्त करण्यात आले होते. त्यानंतर आता तब्बल २५० कोटी रुपयांचे ५० किलो हेरॉईन (heroin) जप्त करण्यात आले आहे. पाकिस्तानी बोटीतून हा हेरॉईनचा साठा भारतात आणला जात असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. त्यानंतर एटीएसने बीएसएफच्या मदतीने ही कारवाई केली आहे.

हे वाचले का?  भारतीय संघ पाकिस्तानला जाणार? परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची पाक नेत्याबरोबर काय चर्चा झाली?