गॅरेजसमोरील वाहनांमुळे अपघाताचा धोका

वाहने रस्त्यावर उभी केली जातात. कित्येक दिवसांपासून ही वाहने तिथेच आहेत.

पोलिसांकडून तीन गॅरेजमालकांना नोटीस

नाशिक : अशोका रस्त्यावरील पोलीस चौकीसमोरील रस्त्यावर गॅरेज मालकांकडून अनधिकृतरित्या उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. या संदर्भात असाच एक अपघात होण्यापासून बचावलेल्या स्वप्नील गायकवाड यांनी

मुंबई नाका पोलीस ठाण्याकडे तक्रार दिली. पोलिसांनी संबंधित गॅरेजमालकांना नोटीस बजावत समज दिली. तथापि, परिस्थितीत फारसा फरक पडला नसल्याने तक्रारदाराचे म्हणणे आहे.

गॅरेजकडे आलेली नादुरुस्त

वाहने रस्त्यावर उभी केली जातात. कित्येक दिवसांपासून ही वाहने तिथेच आहेत. ही वाहने सिग्नल यंत्रणेच्या जवळ आहेत. सिग्नल सुटल्यानंतर वाहने भरधाव निघतात. काही दिवसांपूर्वी सायकलवर प्रवास करत असताना भरधाव वाहनांमुळे अपघात झाला असता. थोडक्यात आपण बचावलो.

हे वाचले का?  सायबर गुन्हेगारीत वाढ, सहा महिन्यात १५ कोटीहून अधिक रक्कम लंपास

या विषयी पोलिसात तक्रार केली असता लेखी तक्रार देण्यास सांगण्यात आल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे. अगदी पोलीस चौकीसमोर अनधिकृतरित्या वाहने उभी आहेत. तरी लेखी स्वरुपात तक्रार देण्यास सांगणे असंवेदशील आणि अनाकलनीय असल्याकडे त्यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात लक्ष वेधले.

परिसरात काही दिवसांपूर्वी वयोवृध्द व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला. वाहतूक कोंडीमुळे अपघात होऊन एखाद्याला हकनाक बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कठोर कारवाईचे निर्देश द्यावेत, जेणेकरून अपघातांची पुनरावृत्ती होणार नाही, अशी मागणी त्यांनी केली. तक्रारीबाबत काय कारवाई झाली याची माहिती गायकवाड यांनी माहितीच्या अधिकारात प्राप्त केली. मुंबई नाका पोलिसांनी तीन गॅरेजमालकांना नोटीस बजावून समज दिली. या दोन्ही बाबी एकाच दिवशी पार पडल्याबद्दल गायकवाड यांनी आश्चर्य व्यक्त केले. पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर अशोका मार्गावर गॅरेजसमोर उभ्या राहणाऱ्या वाहनांच्या संख्येत काहीअंशी फरक पडल्याचे दिसत आहे.

हे वाचले का?  नाशिक: पंचवटी, राज्यराणी एक्स्प्रेसला विलंब, रेल्वेला नोटीस

‘अपघात झाल्यास गॅरेजमालक जबाबदार’

तक्रार अर्ज दाखल झाल्यानंतर मुंबई नाका पोलिसांनी अशोका मार्गावरील जेएडी गॅरेजचे जुनेद सईद सय्यद, सुपर अ‍ॅटो कार सव्र्हिसचे कलाम ईसा अन्सारी आणि मास्टर सव्र्हिस स्टेशनचे मुद्दस्सर नजर जब्बर अहमद अन्सारी यांना नोटीस बजावत समज दिली. गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी येणारी वाहने सार्वजनिक ठिकाणी अथवा अशोका मार्ग पोलीस चौकीसमोर, रस्त्यावर उभी करू नये. ही वाहने आपापल्या गॅरेजमध्ये न्यावी. रस्त्यालगत उभ्या केलेल्या वाहनांमुळे अपघात किंवा जिवितहानी झाल्यास गॅरेज मालकांना जबाबदार धरून कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा नोटीसमधून देण्यात आला आहे. याच दिवशी मुंबई नाका पोलिसांनी तिन्ही गॅरेजमालकांना समजपत्रही दिले. प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार गॅरेज मालकांनी रस्त्यावर वाहने लावल्यास वाहतूक शाखेमार्फत कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सूचित करण्यात आले. वाहन दुरुस्तीवेळी व नादुरुस्त वाहनांमुळे अपघात वा जिवितहानी झाल्यास याकरीता गॅरेज मालकांना जबाबदार धरले जाईल, असेही पोलिसांनी सूचित केले आहे.

हे वाचले का?  गणेश विसर्जनाची पर्यावरणस्नेही तयारी; नाशिकरोड विभागात फिरता तलाव, २९ नैसर्गिक विसर्जन स्थळे- ५६ ठिकाणी कृत्रिम तलाव