चार कोटी वाहनांवर ग्रीन टॅक्स लागणार?

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने याबाबत माहिती दिली.

देशात दोन कोटी वाहने २० वर्षे जुनी

भारतात सध्या १५ वर्षांहून अधिक जुन्या वाहनांची संख्या ४ कोटी आहे. ही वाहने प्रदूषणवाढीस कारणीभूत आहेत. त्या वाहनांवर केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालय ‘ग्रीन टॅक्स’ लावण्याचा विचार करत आहे. १५ वर्षांहून अधिक जुनी वाहने कर्नाटक मध्ये सर्वात जास्त आहेत. तर दुसऱ्या स्थानावर उत्तर प्रदेश आणि तिसऱ्या स्थानावर दिल्ली आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने याबाबत माहिती दिली.

हे वाचले का?  Jammu-Kashmir : जम्मू-काश्मीरच्या राजौरीत २ दहशतवादी ठार, एके-४७ सह दारूगोळा जप्त, लष्कराची मोठी कारवाई

या माहितीनुसार ४ कोटीमधील २ कोटी वाहने २० वर्षांहून अधिक जुनी आहेत. त्या वाहनांवर ग्रीन टॅक्स लावण्याचा प्रस्ताव राज्य सरकारांना पाठवण्यात आला आहे, तर दुसरीकडे सर्वाधिक जुनी वाहने कर्नाटकमध्ये असून त्यांची संख्या ७० लाख आहे. कर्नाटकपाठोपाठ उत्तर प्रदेशमध्ये ५६.५४ लाख जुनी वाहने आहेत. त्यापैकी २४.५५ लाख वाहने २० वर्षांपेक्षा अधिक जुनी आहेत. नवी दिल्लीत ३५ .११ लाख वाहने जुनी आहेत. त्यापाठोपाठ केरळमध्ये ३४.६४ लाख, पंजाबमध्ये २५.३८ लाख, तामिळनाडूमध्ये ३३.४३ लाख, पश्चिम बंगालमध्ये २२.६९ लाख जुनी वाहने आहेत. महाराष्ट्र, ओडिशा, गुजरात, राजस्थान आणि हरियाणात अशा वाहनांची संख्या १२ ते लाख आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी १५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या असणाऱ्या वाहनांवर ग्रीन टॅक्स लावण्याचा प्रस्ताव राज्य सरकारांना पाठवला आहे. राज्य सरकार त्यावर विचार करून तो प्रस्ताव केंद्राकडे परत पाठवतील. त्यानंतर ग्रीन टॅक्स लावण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.