छुप्या दहशतवादाचे हत्यार! जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणांना अतिदक्षता बाळगण्याचे आदेश

तरुणांची माथी भडकावून त्यांची भर्ती करण्यासाठी आणि हल्ल्यांचे नियोजन करण्यासाठी ‘एन्क्रिप्टेड मेसेजिंग अॅप’चा वापर केला जातो.

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसखोरी केलेले दहशतवादी जतन आणि एकत्रीकरणाचे डावपेच वापरत असून हा छुपा धोका असल्याचे सुरक्षा संस्थांनी सांगितले आहे. अलीकडील काळात उत्तर काश्मीर आणि कथुआ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी केलेले हल्ले आणि चकमकी यातून ही बाब दिसून आल्याचे समजते.

दहशतवाद्यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये सुरक्षा दलांवर केलेले हल्ले आणि चकमकी यांचे विश्लेषण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की सुरक्षा यंत्रणांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून, प्रत्यक्ष नागरिकांमधून गोपनीय माहिती मिळण्याचा अभाव यामुळे सुरक्षा दलांच्या मोहिमांवर विपरीत परिणाम होत आहे. केवळ तंत्रज्ञानाच्या आधारे माहितीवर विसंबून राहिल्याने काही फायदा होत नाही कारण दहशतवादी सुरक्षा दलांची दिशाभूल करण्यासाठी ऑनलाइन कृत्ये करत असतात. तरुणांची माथी भडकावून त्यांची भर्ती करण्यासाठी आणि हल्ल्यांचे नियोजन करण्यासाठी ‘एन्क्रिप्टेड मेसेजिंग अॅप’चा वापर केला जातो.

हे वाचले का?  Jammu and Kashmir Exit Polls 2024: जम्मू-काश्मीरमध्ये भरघोस मतदान, आता सत्ता कुणाची? Exit Poll कधी येणार?

जम्मू प्रांतामध्ये परदेशी दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी टेहेळणी वाढवण्याची तातडीची गरज आहे, असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. पूर्वी काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवाया जोरात असताना, जम्मू प्रांतामध्ये शांतता होती. मात्र, अलीकडे जम्मूमध्ये, विशेषत: पूंछ, राजौरी, दोडा आणि रियासी या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. हवाई दलाच्या ताफ्यावरील हल्ला, यात्रेकरूंच्या बसवरील हल्ला आणि कथुआ जिल्ह्यातील सैनिकांवरील हल्ले, यातून ही बाब ठळकपणे अधोरेखित झाली आहे.

हे वाचले का?  सात कोटींची जमीन फक्त ३.७५ लाखांत मिळाली; महिलेसाठी कायदेशीर लढा ठरला भलताच फायदेशीर!

दहशतवाद्यांची रणनीती

जतन आणि एकत्रीकरण डावपेचाअंतर्गत दहशतवादी जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसखोरी करतात, पण सुरुवातीला शांत राहतात, स्थानिकांमध्ये मिसळतात आणि हल्ले करण्यापूर्वी पाकिस्तानातील सूत्रधारांच्या सूचनांची प्रतीक्षा करतात, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. उदाहरणार्थ, सोपोरमध्ये २६ एप्रिलला झालेल्या चकमकीत सहभागी असलेले परदेशी दहशतवादी १८ महिने जम्मू विभागामध्ये लपले होते. त्यांच्याविषयी प्रत्यक्ष नागरिकांमधून माहिती मिळत नसल्यामुळे त्यांचा निपटारा करणे अवघड झाले आहे.