जम्मू-काश्मीर : जोझिला पासजवळ टॅक्सी ३४०० मीटर उंचावरून दरीत कोसळली, बचाव कार्य सुरू

जम्मू-काश्मीरमध्ये जोझिला पासजवळ एक टॅक्सी खोल दरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी बचावकार्य सुरू केलं आहे.

जम्मू-काश्मीरमधील जोझिला पासजवळ बुधवारी एक टॅक्सी व्हॅन खोल दरीत कोसळली. या टॅक्सीमध्ये असलेल्या प्रवाशांचा शोध बचाव पथकांनी सुरू केला आहे. श्रीनगर-लेह महामार्गावर बुधवारी रात्री उशीरा हा अपघात झाला. यात ही टॅक्सी व्हॅन जोझिला पासजवळ खोल दरीत कोसळली. तब्बल ३ हजार ४०० मीटर उंचावरून ही व्हॅन कोसळल्यामुळे त्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या युद्धपातळीवर शोध सुरू करण्यात आला आहे. ही टॅक्सी कारगिलहून श्रीनगरच्या दिशेने जात होती.

हे वाचले का?  Lal Krishna Advani : लालकृष्ण आडवाणी, टेनिसची मॅच आणि संघाचं सदस्यत्व! काय आहे ‘तो’ रंजक किस्सा?

पोलीस, लष्कर आणि स्थानिकांनी अपघाताची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेत प्रवाशांची शोधमोहीम सुरू केली. यासंदर्भात सविस्तर माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.