पंजाबच्या अमृतसर येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात आले आहे
शुक्रवारी उत्तर भारतात बर्याच भागांमध्ये ६.१ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले आहेत. जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजधानी नवी दिल्लीसह अनेक भागांमध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (एनसीएस) ने दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार पंजाबच्या अमृतसर येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात आले आहे.
An earthquake of magnitude 6.1 on the Richter scale hit Amritsar, Punjab at 10:34pm today: National Centre for Seismology
— ANI (@ANI) February 12, 2021
एनसीएसने दिलेल्या माहितीनुसार अमृतसरमध्ये रात्री १०.४३ वाजता भूकंपाचे धक्के बसले, तर काही मिनिटांपूर्वीच ताजिकिस्तानमध्ये ही भूकंप झाल्याची माहिती मिळाली आहे. या भूकंपाची तीव्रतता ही ६. ३ रिश्टर स्केल इतकी होती.
दरम्यान, अद्याप कोणत्याही प्रकारच्या जिवीत किंवा वित्त हानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.