जम्मू-काश्मीर : ‘लष्कर ए तोयबा’च्या टॉप कमांडरसह दोन दहशतवाद्यांचा खात्मा

सोपोर भागात रात्रभर चालली चकमक

जम्मू-काश्मीरमधील सोपोर भागात रात्रभर जवान व दहशतवाद्यांमध्ये चाललेल्या चकमकीत अखेर लष्कर ए तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. या दोन दहशतवाद्यांमध्ये एकजण हा लष्कर ए तोयबाच्या टॉपच्या कमांडर होता, अशी देखील माहिती समोर आली आहे.

बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागातील वारपोरा गावात काल रात्री चकमक सुरू झाली होती. या कारवाईत ठार करण्यात आलेला एक दहशतवादी फयाज वार हा लष्कर ए तोयबाचा टॉपचा कमांडर होता. तो जवान व नागरिकांवर झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांसाठी देखली जबाबदार होता.जवानांनी चकमकीदरम्यान एका दहशतवाद्यांचा काल रात्री उशीरा खात्मा केला. तर, आज पहाटे दुसऱ्या दहशतवाद्याला ठार केलं. सध्या परिसरात शोधीमोहीम सुरू आहे.

हे वाचले का?  छुप्या दहशतवादाचे हत्यार! जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणांना अतिदक्षता बाळगण्याचे आदेश

या अगोदरही जम्मू-काश्मीरच्या शोपियान येथे सुरक्षा दलाच्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाच्या एका टॉप कमांडरला ठार करण्यात आले होते. हा दहशतवादी याआधी जम्मू-काश्मीर पोलिसात होता, त्याने ४ वर्षांपूर्वी नोकरी सोडली होती. दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात रात्रीच्या चकमकीत इशफाक डारसह दोन दहशतवादी ठार झाले. त्या अगोदर दोन दिवसांपूर्वी श्रीनगरमध्ये अशाच प्रकारच्या कारवाईत दोन दहशतवादीह ठार झाले होते.