जिल्हा रुग्णालयातील नेत्ररोग विभाग लवकरच पूर्ववत

पाच महिन्यांहून अधिक काळापासून नेत्ररोग विभाग बंद आहे.

नाशिक : शहरासह जिल्ह्य़ात करोनाचा शिरकाव झाल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालय करोना उपचार केंद्र रुग्णालय म्हणून सेवा देण्यास सुरुवात झाली. परिणामी जिल्हा शासकीय रुग्णालयात होणाऱ्या शस्त्रक्रि या रखडल्या. नेत्ररोग विभागही यास अपवाद राहिला नाही. करोना रुग्णसंख्येत आता घट झाल्याने लवकरच नेत्ररोग विभाग पूर्ण क्षमतेने सुरू होणार असल्याचा दावा जिल्हा रुग्णालयाने के ला आहे.

मार्चमध्ये जिल्ह्य़ात करोना रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. त्यावेळी पहिल्याच टप्प्यात जिल्हा शासकीय रुग्णालय हे करोना रुग्णालय म्हणून जाहीर करण्यात आले. रुग्णालयाच्या मागील इमारतीत करोना कक्ष झाला. रुग्णांची संख्या वाढत असतांना जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वेगवेगळ्या विभागांत होणाऱ्या शस्त्रक्रि या थांबविण्यात आल्या. राज्य शासनाने के लेल्या सुचनेनुसार तातडीच्या शस्त्रक्रि या के वळ रुग्णालयात होत असतांना या आपत्कालीन परिस्थितीत नेत्ररोग विभाग पूर्णपणे बंद करून त्या ठिकाणी प्रसूती कक्ष हलविण्यात आला. त्यामुळे नेत्ररोग विभागात प्रसूती कक्ष कार्यान्वित झाला. या कक्षात स्तनदा माता, गरोदर माता, नवजात बालके  यांची देखभाल होत आहे. नेत्ररोग विभाग बंद असल्याने जिल्हा परिसरातील नेत्ररुग्णांची परवड सुरू झाली. पाच महिन्याहून अधिक काळापासून नेत्ररोग विभाग बंद असल्याने मोतीबिंदूच्या शस्त्रक्रि येसह डोळ्याशी संबंधित अन्य आजाराच्या तपासण्या थांबल्या. रुग्णांची होणारी परवड पाहता जिल्ह्य़ात कळवण आणि मालेगाव येथे नेत्र शस्त्रक्रि या करण्यात येत असल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

हे वाचले का?  भुसावळ – सुरत रेल्वेसेवा विस्कळीत, चिंचपाडा स्थानकात रेल्वे रुळावर मातीचा भराव, मालवाहू गाडी रुतली

याविषयी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे यांनी माहिती दिली. पाच महिन्यांहून अधिक काळापासून नेत्ररोग विभाग बंद आहे. परंतु, करोनाग्रस्त रुग्णांची कमी होणारी संख्या पाहता प्रसूती कक्ष दुसरीकडे हलविण्यात येणार असून नेत्ररोग विभाग लवकरच कार्यान्वित होईल. यंदाचे दिलेले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी नेत्ररोग विभाग प्रयत्नशील राहील असे डॉ.सैंदाणे यांनी नमूद केले.

हे वाचले का?  भुसावळ – सुरत रेल्वेसेवा विस्कळीत, चिंचपाडा स्थानकात रेल्वे रुळावर मातीचा भराव, मालवाहू गाडी रुतली