जिल्ह्य़ातील ८९ हजार रुग्ण आतापर्यंत करोनामुक्त

१ हजार ६७२ रुग्णांचा मृत्यू

१ हजार ६७२ रुग्णांचा मृत्यू

नाशिक : जिल्ह्यातील ८८ हजार ९११ करोना बाधितांना आतापर्यंत उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून  सद्यस्थितीत तीन हजार ५६४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सक्रि य रुग्णांमध्ये २५७  ने घट झाली आहे. आतापर्यंत एक हजार ६७२  रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

जिल्ह्य़ातील करोना संसर्ग आटोक्यात येत असल्याने प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु, दिवाळीत खरेदीसाठी होणारी गर्दी प्रशासनाची चिंता वाढवित आहे. सध्या करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ९४ हजार १४७ वर पोहचली आहे. त्यापैकी ८८ हजार ९११ रुग्ण उपचारानंतर घरी गेले असून नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ११४, चांदवड २७, सिन्नर ३१९, दिंडोरी १०९, निफाड  २६८, देवळा ११, नांदगांव ९९, येवला ११, त्र्यंबकेश्वर २०, सुरगाणा चार, पेठ  एक, कळवण २३,  बागलाण ३८, इगतपुरी २९, मालेगांव ग्रामीण ६५ याप्रमाणे एकूण एक  हजार १३८ सकारात्मक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात दोन हजार २९२, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १२०  तर जिल्ह्याबाहेरील १४ याप्रमाणे एकूण तीन हजार ५६४  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

हे वाचले का?  नाशिक : शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी

जिल्ह्य़ात रुग्ण बरे होण्याच्या टक्के वारीत झपाटय़ाने सुधारणा होत आहे.  नाशिक ग्रामीणमध्ये ९३.५६, नाशिक शहरात ९४.९३, मालेगावात ९३.०२  टक्के तर जिल्हाबा रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.७७ टक्के आहे. जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९४.४४  इतके झाले आहे. नाशिक ग्रामीण ६०१, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ८६७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १६६ आणि जिल्हा बाहेरील ३८ याप्रमाणे एकूण एक हजार ६७२  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हे वाचले का?  संविधान वाचविण्यासाठी राज्यभर सभांव्दारे प्रबोधन – श्याम मानव यांची मोहीम