जेजुरीत खंडोबाच्या खंडोबागडावर घटस्थापना चंपाषष्ठी उत्सवास प्रारंभ

आज सकाळपासूनच खंडोबाच्या दर्शनासाठी गर्दी

जेजुरीच्या खंडोबा गडावर आज चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात झाली.सकाळी अकरा वाजता खंडोबा गडातील नवरात्र महालात वेद मंत्राच्या घोषात खंडोबा-म्हाळसा देवीच्या मूर्तींची घटस्थापना करण्यात आली.मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदा ते षष्ठी पर्यंत हा उत्सव साजरा होत आहे.रविवारी चंपाषष्ठी आहे.उत्सवानिमित्त खंडोबा मंदिराला विविधरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे तर ऐतिहासिक गडाला आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने सारा गड उजळला आहे.

हे वाचले का?  त्र्यंबकेश्वर मंदिरातील विशेष दर्शन व्यवस्था श्रावणात बंद

येवला येथील कापसे परिवाराने अर्पण केलेल्या पैठण्या म्हाळसादेवी,बाणाईदेवी मूर्तींना परिधान करण्यात आल्या.मुख्य मंदिरातील पाकाळणी,पूजा-अभिषेक झाल्यानंतर उत्सवमूर्ती सनई-चौघड्याच्या वाद्यांमध्ये नवरात्र महालात आणण्यात आल्या.यावेळी सदानंदाचा येळकोट असा जयघोष करित भंडार्‍याची उधळण करण्यात आली.

आज गडावर घटस्थापनेसाठी भीष्माचार्यजी महाराज,विश्वस्त संदीप जगताप,राजकुमार लोढा,पंकज निकुडे,ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे,पुजारी प्रशांत सातभाई,चेतन सातभाई,मिलिंद सातभाई,संजय आगलावे,दिनेश बारभाई,राजाभाऊ चौधरी,माऊली खोमणे,कृष्णा कुदळे,जालिंदर खोमणे,हरिभाऊ लांघी आदी उपस्थित होते.वेदमूर्ती शशिकांत सेवेकरी यांनी पौरोहित्य केले.

हे वाचले का?  तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकमध्ये भक्तांची गर्दी

पूजारी सेवक अन्नदान मंडळाच्यावतीने भाविकांसाठी गडावर दररोज भोजन प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.महाराष्ट्रात मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदा म्हणजे देवदीवाळी ते षष्टी या काळात घरोघरी नवरात्र उत्सव साजरा केला जातो.मणिमल्ल दैत्याचा संहार करण्यासाठी शंकराने या काळात मार्तंड भैरवाचा अवतार घेतल्याची आख्यायिका आहे.त्यामुळे या दिवसाला धार्मिक दृष्टया फार महत्व आहेत.आज सकाळपासून खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती.