टोक्यो ऑलिम्पिक स्पध्रेपुढेही प्रश्नचिन्ह?

भारतामधील करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढल्यामुळे मंगळवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) तातडीने स्थगित करावी लागली.

आणीबाणी वाढवण्याच्या शक्यतेमुळे चिंतेत वाढ

भारतामधील करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढल्यामुळे मंगळवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) तातडीने स्थगित करावी लागली. करोना साथीच्या पाश्र्वभूमीवर जपानमधील आणीबाणी वाढण्याची चिन्हे असल्यामुळे प्रतिष्ठेची टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धासुद्धा रद्द केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे वाचले का?  Hardik Pandya : हार्दिकने मोडला विराटचा खास विक्रम! भारतासाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

करोनाच्या पाश्र्वभूमीवर टोक्यो, ओसाका, क्योटो आणि ह्य़ोगो या शहरांत ११ मेनंतरही आणीबाणी वाढवण्यात येणार आहे, असा दावा ‘योमियुरी’ वृत्तपत्राने बुधवारी केला आहे. या शहरांमध्ये २५ एप्रिलपासून आणीबाणी लागू करण्यात आली आहे. परंतु या परिस्थितीत २३ जुलपासून ऑलिम्पिकचे आयोजन केले गेल्यास चाहत्यांवर मात्र बंदी घातली जाऊ शकते.