टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताची सर्वोत्तम कामगिरी!

नेमबाज अभिनव बिंद्राला विश्वास

टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेत भारत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी बजावेल, असा विश्वास भारताचे सुवर्णपदक विजेते नेमबाज अभिनव बिंद्राने व्यक्त केला आहे.

टोक्यो ऑलिम्पिकला २०० दिवस बाकी असल्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात बिंद्रा म्हणाला, ‘‘भारताने २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक सहा पदकांची कमाई केली होती. क्रीडा प्रकारात लिखित संहिता नसते. परंतु टोक्योत भारताची कामगिरी उंचावेल.’’

हे वाचले का?  ऑलिम्पिक आयोजनाचे स्वप्न! स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

‘‘नेमबाजीप्रमाणेच अन्य काही क्रीडा प्रकारांमध्ये भारताला निश्चित पदकाची शाश्वती आहे. परंतु स्पध्रेच्या दिवसावरच पदकाची समीकरणे अवलंबून असतील,’’ असे बिंद्राने सांगितले.

ऑलिम्पिकच्या आव्हानांसाठी सज्ज -मनप्रीत

टोक्यो ऑलिम्पिकसाठी वाटचाल करीत असताना सामोरे जावे लागणाऱ्या अनेक आव्हानांसाठी आम्ही मानसिकदृष्टय़ा सज्ज आहोत, अशी प्रतिक्रिया भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंगने सांगितले. ‘‘कोणत्याही बा घटकांमुळे आमचे लक्ष्य विचलित होणार नाही, हा मागील वर्षांने आम्हाला महत्त्वाचा धडा दिला आहे. अनेक बाबींमध्ये अनिश्चितता आहे. परंतु जे आवाक्यात नाही, त्याची चिंता करण्यात काहीच अर्थ नाही. त्यापेक्षा आगामी स्पध्रेत सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी सज्ज होऊ,’’ असे मनप्रीतने सांगितले.

हे वाचले का?  Suryakumar Yadav : संजू सॅमसनला नडणाऱ्या मार्को यान्सनशी भिडला सूर्या, लाइव्ह सामन्यातील वादावादीचा