ताडोबात २०० पशु, पक्ष्यांचा आवाज काढणारा ‘बर्डमॅन’

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात विविध पशु पक्ष्यांचे २०० आवाज काढणारा अनोखा अवलिया कार्यरत आहे. ताडोबामध्ये येणाऱ्या पर्यटकांना पशु, पक्ष्यांचे विविध आवाज काढून दाखवत असल्याने ताडोबामध्ये त्याला ‘बर्डमॅन’ म्हणून ओळखले जात आहे.

चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात विविध पशु पक्ष्यांचे २०० आवाज काढणारा अनोखा अवलिया कार्यरत आहे. ताडोबामध्ये येणाऱ्या पर्यटकांना पशु, पक्ष्यांचे विविध आवाज काढून दाखवत असल्याने ताडोबामध्ये त्याला ‘बर्डमॅन’ म्हणून ओळखले जात आहे. सुमेध वाघमारे असे त्यांचे नाव आहे. या ‘बर्डमॅन’मुळे पर्यटकांना पशु व पक्ष्यांचा आवाज ऐकायला मिळत आहे.

हमखास व्याघ्रदर्शन होत असल्याने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रसिद्ध आहे. देश-विदेशातील पर्यटक जंगल सफारी व व्याघ्र सफारीसाठी ताडोबात येत असतात. ताडोबामध्ये वाघ, बिबट यासह पशु, पक्षीसुद्धा मोठ्या संख्येने आहेत. ताडोबात जवळपास २०० हून अधिक पशू व पक्ष्यांची नोंद आहे. शहरी भागातील वाढते औद्योगिकरण, सिमेंटची घरे, प्रदूषण यामुळे पक्षी नाहीसे होत आहे. त्यामुळे लुप्त होत असलेल्या पक्ष्यांना बघणे व त्यांचा आवाज ऐकणे हा एक सुखद क्षण आहे.

हे वाचले का?  Sharad Pawar NCP 5th Candidate List : मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पाचवी यादी जाहीर; माढा मतदारसंघात दिली ‘या’ नेत्याला उमेदवारी

ताडोबामध्ये कार्यरत असलेले सुमेध वाघमारे हे तब्बल २०० पशु, पक्ष्यांचे आवाज काढतात. चिमणी, कावळा, मोर, लांडोर, कोंबळी, कोकीळा, रानम्हैस, रानगवा यासह २०० हून अधिक पशु व पक्ष्यांचे आवाज काढून पर्यटकांना याबद्दल माहिती देत आहे. यामाध्यमातून ते निसर्गाला वाचविण्याचा संदेश देत असतात. २०० हून अधिक पशू पक्ष्यांचे आवाज काढत असल्याने सुमेध वाघमारेला ‘बर्डमॅन’ म्हणून ओळखले जात आहे. विशेष म्हणजे, वाघमारे यांनी संघर्ष करित हे यश मिळविले आहे.

हे वाचले का?  Sharad Pawar : अजित पवारांचा शिंदेंना दम? शरद पवारांकडून भर सभेत मिमिक्री; म्हणाले, “शिंदेंनी मला विनंती केली, समजून घ्या…”

आवाज काढण्याचे उपजत कलागुण असलेल्या वाघमारे यांनी परिस्थितीशी दोन हात करित कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कधी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय केला, तर कधी अन्य काम करून पोट भरले. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात परिक्षा देण्यासाठी वाघमारे चंद्रपुरात आले. त्यांच्या उपजत कलागुणांची दखल ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांच्यासह ताडोबा कोरचे उपवनसंरक्षक नंदकुमार काळे, मोहुर्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी घेतली. त्यानंतर तीन महिन्यांपूर्वीच वाघमारे ताडोबात दाखल झाले.

ताडोबात आता ते वेगवेगळ्या पक्षांचा आवाज काढून पर्यटकांचे मनोरंजन करतात. तसेच त्यांच्या आवाजाचे ‘शो’देखील ताडोबात आयोजित केले जात आहे. वाघमारे यांनी यापूर्वी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत याच पद्धतीचे काम केले आहे. त्यांच्या आवाजाच्या जादूची किमया आता ताडोबा प्रकल्पात दाखवून पर्यटकांचे मनोरंजन ते करत आहे.

हे वाचले का?  धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण? ‘धनगड’ प्रमाणपत्रे रद्द; शिंदे समितीचा अहवाल सादर

I