तिरुपती देवस्थानाला ९.२ कोटींचे मरणोत्तर दान

चेन्नईतील ७६ वर्षांच्या एका महिलेने तिरुपतीच्या भगवान व्यंकटेश्वर मंदिराला ९.२ कोटी रुपयांचे मरणोत्तर दान केले आहे.

चेन्नईतील ७६ वर्षांच्या एका महिलेने तिरुपतीच्या भगवान व्यंकटेश्वर मंदिराला ९.२ कोटी रुपयांचे मरणोत्तर दान केले आहे.

 पार्वतम नावाच्या या अविवाहित स्त्रीच्या वतीने तिच्या बहिणीने ६ कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तेची कागदपत्रे आणि ३.२ कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्ट गुरुवारी सकाळी तिरुमला तिरुपती देवस्थानचे (टीटीडी) अध्यक्ष वाय.व्ही. सुब्बा रेड्डी यांना मंदिरात सोपवला, अशी माहिती मंदिराच्या अधिकाऱ्यांनी दिली. ३.२ कोटी रुपयांच्या रोख रकमेचा विनियोग या मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानच्यावतीने बांधण्यात येत असलेल्या मुलांसाठीच्या अतिविशेषोपचार रुग्णालयासाठी करावा, अशी विनंती कुटुंबीयांनी टीटीडीला केली.

हे वाचले का?  महामतदान २० नोव्हेंबरला! राज्यात विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २३ नोव्हेंबर रोजी निकाल