दर गडगडल्याने टोमॅटो फेकून शेतकऱ्यांचा निषेध

आदल्या दिवशी अनेकांनी मालाची विक्री न करता ते फेकून देणे पसंत केले होते.

२० किलोच्या जाळीला ६० रुपये; पणन मंडळ जबाबदार असल्याचा सदाभाऊ खोत यांचा आरोप

नाशिक : काही दिवसांपासून टोमॅटोला तीन रुपये किलो भाव मिळत असल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी गुरूवारी येथील बाजार समितीच्या आवारात टोमॅटो टाकू न संताप व्यक्त केला. बाजारात २० किलोच्या जाळीला ६० रुपये भाव मिळतो. त्यातून उत्पादन, वाहतूक खर्च देखील भरून निघणार नसल्याची भावना त्यांनी मांडली. टोमॅटोसह अन्य कृषिमालाचे दर घसरण्यास पणन मंडळ जबाबदार असल्याचा आरोप माजी कृषी राज्यमंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केला.

गुरूवारी सायंकाळी खोत यांनी बाजार समितीत भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. पाच ते सहा दिवसात भाजीपाल्याचे दर कमालीचे घसरले आहेत. टोमॅटोला केवळ तीन रुपये भाव मिळत आहे. लागवडीसाठी हजारो रुपये खर्च केले. प्रति जाळी वाहतुकीचा खर्च मोठा आहे. तीन रुपयात कुठलाही खर्च भरून निघणार नसल्याने दोन ते तीन टेम्पोतील शेकडो जाळ्या टोमॅटो समितीच्या परिसरात टाकू न दिले.

हे वाचले का?  भुसावळ – सुरत रेल्वेसेवा विस्कळीत, चिंचपाडा स्थानकात रेल्वे रुळावर मातीचा भराव, मालवाहू गाडी रुतली

आदल्या दिवशी अनेकांनी मालाची विक्री न करता ते फेकून देणे पसंत केले होते. त्यांची साफसफाई होत नाही तोच पुन्हा शेकडो जाळ्या टोमॅटो टाकण्यात आला. टोमॅटोचे दर एक रुपयापर्यंत आले. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले. शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडविल्यास उद्रेक होईल, असा इशारा खोत यांनी दिला. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. टोमॅटो आणि कृषिमाल देशांतर्गत बाजारपेठेत पाठविला जाईल याची पणन मंडळाने व्यवस्था करणे आवश्यक होते. मंडळाने तसे कुठलेही नियोजन केले नाही. सद्यस्थितीला पणन मंडळ जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.

कारलेही बांधावर फे कण्याची वेळ

बाजारातील अस्थिरतेमुळे शेतीमालाला भाव नसल्याने कारले बांधावर फे कण्याची वेळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. दीपक बच्छाव या शेतकऱ्याने नातेवाईकांकडून पैसे जमवून कारले पिकविले. परंतु, अवघा चार रुपये किलो भाव मिळाल्याने त्यांनी कारले सरळ बांधावर टाकले. बच्छाव यांचे काष्टी फाट्यावर शेत असून कारले पिकाला कायम चांगला भाव मिळत असल्याने त्यांनी तीन एकरात कारल्याची लागवड केली. त्यासाठी मित्रमंडळी, नातेवाईक यांच्याकडून तीन ते साडे तीन लाख रुपये भांडवल जमविले. परंतु, कारले निघण्यास सुरुवात झाली आणि भाव कोसळले. कमी भाव असल्याने विक्री करुनही उपयोग नव्हता. कारले तोडून बाजारात नेण्यासाठी लागणारा खर्चही वसून होणार नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी कारले बांधावरच टाकण्याचा निर्णय घेतला. जिल्हा बँकेचे सात ते आठ लाख रुपये शेती कर्ज थकीत असल्यामुळे त्यांचा वसुलीसाठी तगादा सुरु आहे. उत्पन्नच नाही तर कर्ज कसे फे डणार, असा प्रशद्ब्रा बच्छाव यांच्यासमोर आहे. पीक विम्याचा पैसा वेळेवर मिळत नसल्याने या वर्षी ८० हजार शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवली आहे. पिकांना भाव मिळत नसतांना पाऊसही साथ देत नसल्याने शेतकऱ्यांपुढील संकटात वाढ झाली आहे. याविषयी  शरद पाटील या शेतकऱ्याने कधी पाऊस धोका देतो तर, कधी शेतमालाच दर अशी अनिश्चिातता मांडली. मुलांचे शिक्षण, वृद्ध आईचा दवाखाना, बँेके च हप्ते यासाठी पैसा कु ठून आणणार, असा प्रश्न त्यांनी के ला.

हे वाचले का?  सप्तश्रृंग गड रस्त्यावरील खड्ड्यांमुळे भाविकांचे हाल

टोमॅटोचा चिखल

बाजार समितीत जिथे कृषिमालाचे लिलाव होतात, त्याच्या बाहेरील मोकळ्या जागेत वाहने उभी केली जातात. टोमॅटोची प्रचंड आवक आणि कोलमडलेले दर यामुळे वाहनतळ परिसरात टोमॅटो टाकले जात आहेत. त्यावरून अन्य वाहनधारक ये-जा करीत असल्याने वाहनतळाच्या परिसरात टोमॅटोचा चिखल झाल्याचे पहायला मिळाले.