दररोज ३३ कि.मी. रस्तेबांधणीचा विक्रम

मुंबई-दिल्ली द्रुतगती महामार्गाच्या बांधकामात जागतिक विक्रम होत असतानाच हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे.

दररोज ३३ कि.मी. इतक्या लांबीच्या महामार्गाचे बांधकाम करून या क्षेत्रात एक नवा विक्रमी टप्पा गाठण्यात आल्याचे सोमवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे सांगितले.

या आर्थिक वर्षांत आतापर्यंत ११ हजार ३५ कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे बांधकाम करून हा टप्पा गाठण्यात आला, आजमितीपर्यंत आम्ही ११ हजार ३५ कि.मी. लांबीचे रस्ते बांधले, म्हणजेच एका दिवसात ३२.८५ कि.मी. लांबीच्या रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले आणि हा एक विक्रम आहे, येत्या ३१ मार्चपर्यंत दररोज ४० कि.मी. लांबीच्या रस्त्याचे बांधकाम करण्यात येईल, अशी अपेक्षा असल्याचेही गडकरी यांनी येथे वार्ताहरांना सांगितले.

हे वाचले का?  भारतात अनेक सिंगापूर निर्माण करण्याचा ध्यास; दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

कोविड-१९ मुळे निर्बंध असतानाही हे उद्दिष्ट गाठण्यात आले, त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे, असेही ते म्हणाले. मुंबई-दिल्ली द्रुतगती महामार्गाच्या बांधकामात जागतिक विक्रम होत असतानाच हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे.