दहा राज्यात करोनाचा प्रकोप!; केंद्र सरकारने दिल्या कडक उपाययोजना करण्याच्या सूचना

देशात पुन्हा एकदा करोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे. मागच्या चार दिवसात करोनावर उपचार करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

देशात पुन्हा एकदा करोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे. मागच्या चार दिवसात करोनावर उपचार करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दहा राज्यात करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचं दिसून आलं आहे. यासाठी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दहा राज्यांचा आढावा घेतला. केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडु, ओडिशा, आसाम, मिझोरम, मेघालय, आंध्र प्रदेश आणि मणिपूर राज्यातील करोनास्थिती जाणून घेतली. तसेच करोनाबाबत उपाययोजना करणाच्या सूचना केल्या. ४६ जिल्ह्यांमध्ये करोना रुग्णवाढीचा दर १० टक्क्यांहून अधिक आहे. तर ५३ जिल्ह्यांत करोना रुग्णवाढीचा दर ५ ते १० टक्क्यांदरम्यान आहे. त्यामुळे अधिक चाचण्या करण्यावर भर देण्यास सांगितलं आहे.

हे वाचले का?  Mithun Chakraborty Dadasaheb Phalke Award : मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, सिनेसृष्टीतील योगदानाबाबत गौरव

मागच्या काही आठवड्यात ज्या जिल्ह्यात करोना रुग्णवाढीचा दर १० टक्क्यांहून अधिक आहे, अशा ठिकाणी कडक निर्बंध लादण्याच्या सल्ला देण्यात आला आहे. वेळीच उपाययोजना केल्या नाही, तर स्थितीत आणखी बिकट होईल असं सांगण्यात आलं आहे. दहा राज्यातील ८० टक्के करोनाचे रुग्ण हे होम आयसोलेशनमधून समोर येत आहेत. त्यामुळे राज्यांनी वाड्या-वस्त्या, कॉलनीतील लोकांना एकमेकांना भेटण्यास मज्जाव करावा. रुग्णालयातील रुग्णांवर योग्य उपचार मिळावे, यासाठी उपाययोजना कराव्यात. त्याचबरोबर होम आयसोलेनमधील रुग्णांची योग्य देखभाल करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

हे वाचले का?  Budget 2024 :पदकवीर दोघेच! अर्थसंकल्पात बिहार, आंध्रवर मेहेरनजर, महाराष्ट्र ‘कोरडा’च!, रोजगारनिर्मितीसा अनेक योजना

करोना आधी संपणार की व्यापारी?; बॅनर्स घेऊन पुण्यातील व्यापारी रस्त्यावर

NEXT STORIES