दहा लाखांवर विद्यार्थी शिक्षणासाठी विदेशात, ‘या’ पाच देशांना सर्वाधिक पसंती

विदेशात शिक्षण घेण्याची अनेकांना ओढ असते. उच्च शिक्षणासाठी नामवंत जागतिक विद्यापीठात भारतीय विद्यार्थी प्रवेश मिळावा म्हणून खटाटोप करतात, तर केंद्र व राज्य शासनपण त्यासाठी विविध योजना राबवितात.

वर्धा : विदेशात शिक्षण घेण्याची अनेकांना ओढ असते. उच्च शिक्षणासाठी नामवंत जागतिक विद्यापीठात भारतीय विद्यार्थी प्रवेश मिळावा म्हणून खटाटोप करतात, तर केंद्र व राज्य शासनपण त्यासाठी विविध योजना राबवितात. म्हणून दरवर्षी ही संख्या वाढत आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २०२२ या वर्षात १० लाख ३० हजार विद्यार्थी विविध देशात शिकत होते. आज भारतीय विद्यार्थी जगातील ७९ देशांत विविध शाखांचे शिक्षण घेत आहे. मात्र पाच देशांना सर्वाधिक पसंती दिल्या जाते.

हे वाचले का?  नाशिक : शिक्षण हे परिवर्तनाचे माध्यम, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे प्रतिपादन