दिलासादायक बातमी! देशात नव्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांचा आकडा अधिक

गेल्या २४ तासांतील देशात नव्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्तांचा आकडा अधिक आहे. निश्चितच ही एक दिलासादायक बाब आहे.

देशात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात आल्याने दररोज वाढणाऱ्या करोनाबाधितांच्या आकड्याकडे विशेष लक्ष असणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (१३ सप्टेंबर) जारी केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात २७ हजार २५४ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे याच एका दिवसात तब्बल ३७ हजार ६८७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. मात्र, गेल्या २४ तासांत देशात करोनामुळे २१९ जणांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. त्यामुळे, देशातील करोना मृत्यूंचा एकूण आकडा आता ४ लाख ४२ बाजार ८७४ वर गेला आहे.

हे वाचले का?  काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर फारुख अब्दुल्ला आक्रमक, पाकिस्तानला इशारा देत म्हणाले…

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, देशातील आतापर्यंत एकूण ३ कोटी ३२ लाख ६४ हजार १७५ करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर त्यापैकी आतापर्यंत एकूण ३ कोटी २४ लाख ४७ हजार ३२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्याचसोबत, सद्यस्थितीत देशात ३ लाख ७४ हजार २६९ इतके रुग्ण करोनावर उपचार घेत आहेत. दरम्यान, गेल्या २४ तासांतील आकडेवारीत नव्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्तांचा आकडा अधिक आहे. निश्चितच ही बाब अत्यंत दिलासादायक असून येत्या काळात देखील परिस्थिती अधिकाधिक नियंत्रणात राहावी यासाठी खबरदारी घेणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

हे वाचले का?  Jammu and Kashmir Exit Polls 2024: जम्मू-काश्मीरमध्ये भरघोस मतदान, आता सत्ता कुणाची? Exit Poll कधी येणार?

करोना प्रतिबंधक लसीकरण

देशातील करोना प्रतिबंधक लसीकरणाचा अधिकृत आकडा पहिला तर, गेल्या २४ तासांत ५३ लाख ३८ हजार ९४५ नागरिकांना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत देशात एकूण ७४ कोटी ३८ लाख ३७ हजार ६४३ जणांना लस दिली गेली आहे.