देशभरात नाताळाचा उत्साह; राष्ट्रपतींसह पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

करोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने होतोय नाताळ साजरा

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा नाताळाचा सण उत्साहात पण अत्यंत साधेपणाने साजरा केला जात आहे. या सणानिमित्त अर्थात येशू ख्रिस्ताच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रपती कोविंद यांनी ट्विटद्वारे जनतेला शुभेच्छा देताना म्हटलं, “ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा! मी आशा करतो की हा सण शांती आणि समृद्धीचा प्रसार करत समाजात सौहार्द वाढवेल. चला आपण येशूच्या प्रेम, करुणा आणि परोपकारी शिकवणींचं अनुसरण करुयात. तसेच समाज आणि राष्ट्रहितासाठी संकल्पबद्ध ऱाहुयात”

हे वाचले का?  अन्यथा ‘लाडकी बहीण’ रद्द करू! सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा

दरम्यान, करोनाच्या संकाटाच्या पार्श्वभूमीवर यंदा नाताळ साजरा करताना सरकारने अनेक निर्बंध घातले आहेत. तोंडाला मास्क लावणे, चर्चमध्ये प्रार्थनेसाठी २० पेक्षा अधिक लोकांची गर्दी होता कामा नये, रात्रीच्या नाताळ पार्ट्यावर निर्बंध, ६० वर्षांवरील व्यक्ती आणि लहान मुलांना शक्यतो घराबाहेर पडू नये, शक्यतो घरातच सेलिब्रेशन करावं, फिजिकल डिस्टंसिंगचे कसोशीने पालन करावे अशी नियमावली या निमित्त जाहीर करण्यात आली आहे.

हे वाचले का?  अंतराळातील कचऱ्याबद्दल राष्ट्रपतींकडून चिंता व्यक्त