“देशाला हॉकी संघाचा अभिमान”; ऐतिहासिक विजयानंतर नरेंद्र मोदींकडून भारतीय संघाला शुभेच्छा

रिओ ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या जर्मनीला टक्कर देत भारताचे पदकाचे स्वप्न आता साकार झाले आहे.

उपांत्य फेरीमधील निराशाजनक पराभव मागे टाकून ४१ वर्षांचा ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवण्याच्या इराद्याने भारतीय पुरुष संघाने गुरुवारी बलाढय़ जर्मनीशी लढत कांस्यपदकावर नाव कोरले आहे. आठ ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकणाऱ्या भारताने १९८०च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये अखेरचे पदक जिंकले होते. रिओ ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या जर्मनीला टक्कर देत भारताचे पदकाचे स्वप्न आता साकार झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या ऐतिहासिक कामगिरीबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.

हे वाचले का?  ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या जन्मगावी क्रीडा संकुलासाठी अखेर २५.७५ कोटींचा निधी मंजूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. “ऐतिहासिक! असा दिवस जो प्रत्येक भारतीयाच्या स्मरणात कोरला जाईल. कांस्य जिंकल्याबद्दल आमच्या पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन. या पराक्रमाने त्यांनी संपूर्ण राष्ट्राची, विशेषत: आपल्या तरुणांच्या कल्पनाशक्तीवर विजय मिळवला आहे. भारताला आमच्या हॉकी संघाचा अभिमान आहे,” असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. भारतीय संघाने जर्मनीचा पराभव करत कांस्यपदक मिळवलं आहे. तब्बल ४१ वर्षांनंतर भारतीय संघाला हॉकीमध्ये पदक मिळालं आहे. अत्यंत चुरशीच्या अशा लढतीत भारतीय संघाने जर्मनीचा ५-४ ने पराभव केला. सुरुवातीला पराभवाच्या छायेत असणाऱ्या भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन केलं. भारताचा हा विजय हॉकीच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिला जाईल असाच आहे.

हे वाचले का?  Jammu-Kashmir : जम्मू-काश्मीरच्या राजौरीत २ दहशतवादी ठार, एके-४७ सह दारूगोळा जप्त, लष्कराची मोठी कारवाई

दरम्यान, रविवारी सकाळी सात वाजता भारत विरुद्ध ब्रिटन सामना सुरु झाल्यानंतर पहिल्या हाफनंतर दोन्ही संघ २-२ च्या बरोबरीत असतानाच मोदींनी पहिल्या क्वार्टरनंतर सात वाजून ३७ मिनिटांनी एक ट्विट केलं होतं. यामध्ये मोदींनी, “मी भारत विरुद्ध बेल्जियमदरम्यानचा पुरुष हॉकीचा उपांत्य फेरीचा सामना पाहत आहे. मला आपल्या संघाचा आणि त्यांच्या कौशल्याचा अभिमान आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो,” असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.

हे वाचले का?  उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन