धनगर आरक्षणप्रश्न संसदेत मांडू – सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनात ‘इंडिया आघाडी’च्या वतीने आपण धनगर आरक्षणप्रश्नी आवाज उठवणार असल्याचे सांगितले.

नगर : धनगर आरक्षणप्रश्री चोंडी (ता. जामखेड) येथे चालू असलेल्या आंदोलनाकडे निर्दयी सरकार दुर्लक्ष करत असल्याचेच दिसते, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनात ‘इंडिया आघाडी’च्या वतीने आपण धनगर आरक्षणप्रश्नी आवाज उठवणार असल्याचे सांगितले.

खासदार सुप्रिया सुळे यांनी चोंडीत येऊन धनगर आरक्षणप्रश्री उपोषणास बसलेल्या आंदोलकांची भेट घेऊन एक तास चर्चा केली. आमदार रोहित पवार या वेळी उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या मुंबईतील बैठकीत धनगर आरक्षणाचा विषय चर्चेत घेण्याबाबत खा. सुळे यांनी महाविकास आघाडीचे नेते राजेश टोपे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली, तर आमदार रोहित पवार यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क करून, आंदोलकांची प्रकृती खालावल्याने, शासनाने या आंदोलनाची दखल घेण्याबाबत कळवावे, असे सांगितले.

हे वाचले का?  Maharashtra Breaking News Live : धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; अजित पवार गट नाराज? म्हणाले, “आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं”

या वेळी धनगर आरक्षणप्रश्री खा. सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवण्याबरोबरच ट्वीट करून लक्ष वेधणार असल्याचे सांगितले. सहा दिवसांपासून उपोषण सुरू असतानाही पालकमंत्री किंवा अन्य कोणीही मंत्री आंदोलकांकडे फिरकला नसल्याबाबत खा. सुळे यांनी आश्चर्य व्यक्त करत, याबाबत जाब विचारला जाणार असल्याचे सांगितले.

भाजपने भूमिका स्पष्ट करावी

भाजप सरकार राज्यात एक आणि केंद्रात वेगळीच भूमिका घेताना दिसत आहे. संसदेत धनगर आरक्षणाचा प्रश्र मांडला, तर भाजपचेच खासदार आरक्षण देण्यास विरोध करतात. त्यामुळे धनगर आरक्षणप्रश्री भाजपने भूमिका स्पष्ट करावी, असेही आवाहन खा. सुळे यांनी केले.

हे वाचले का?  Sharad Pawar : राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण? शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “आमच्याकडून…”

पाच युवकांचे मुंडण

धनगर आरक्षणप्रश्री चोंडीत सुरू असलेल्या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ पाच युवकांनी आज, मंगळवारी उपोषणाच्या सातव्या दिवशी मुंडण आंदोलन केले. अद्याप कोणताही सरकारमधील कोणताही मंत्री वा उच्चपदस्थ अधिकारी या आंदोलनाकडे फिरकला नाही. दरम्यान, उपोषणकर्ते अण्णासाहेब रूपनवर आणि सुरेश बंडगर यांची प्रकृती खालावल्याने चिंता व्यक्त केली जात असतानाच, सरकार दखल घेत नसल्याने, धनगर समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात असल्याचे यशवंत सेनेचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे यांनी सांगितले.