नकारात्मक अहवाल आलेल्या ६ हजार २९४ चे जणांचे लसीकरण

लस पुरवठा मर्यादित असल्याने काही निवडक केंद्रांवर लसीकरण पार पडत आहे.

नाशिक : लसीकरणाआधी करोना चाचणी करून त्यातील सकारात्मक रुग्ण शोधणे आणि नकारात्मक व्यक्तींचे लसीकरण या उपक्रमांतर्गत १० व्या दिवशी म्हणजे सोमवारी ९६८ प्रतिजन चाचण्या होऊन चार सकारात्मक रुग्ण शोधण्यात यश मिळाले. हे अभियान सुरू झाल्यापासून १० दिवसात ६२९४ प्रतिजन चाचण्या होऊन ९७ रुग्णांना शोधण्यात आले. नकारात्मक अहवाल आलेल्या ६५१५ रुग्णांचे लसीकरण करण्यात आले.

महानगरपालिका, भारतीय जैन संघटना, वॉटर ग्रेस कंपनी आणि नाशिक वॉरियर्स यांच्यावतीने गुरूवारपासून शून्य मोहीम आणि लसीकरण या उपक्रमास सुरूवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात पंचवटी विभागातील इंदिरा गांधी रुग्णालय, फुलेनगर येथील मायको दवाखाना आणि म्हसरूळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात हे अभियान सुरू झाले.

हे वाचले का?  भुसावळ – सुरत रेल्वेसेवा विस्कळीत, चिंचपाडा स्थानकात रेल्वे रुळावर मातीचा भराव, मालवाहू गाडी रुतली

सध्या ४५ वयोगटापुढील व्यक्तींचे लसीकरण सुरू आहे.  लस पुरवठा मर्यादित असल्याने काही निवडक केंद्रांवर लसीकरण पार पडत आहे. परिणामी लसीकरणाआधी प्रतिजन चाचण्यांचे काम मर्यादित स्वरूपात होत आहे. पंचवटीनंतर नाशिकरोड विभागात हा उपक्रम सुरू करण्यात आला. लसींचा साठा उपलब्ध झाल्यावर शहरातील सर्व विभागात लसीकरणाआधी चाचणी करण्याचे नियोजन आहे.

सद्यस्थितीत पंचवटी विभागातील मायको दवाखाना, म्हसरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, मखमलाबाद, हिरावाडी, रेडक्रॉस, तपोवन, नांदूर, नाशिकरोड विभागातील खोले मळा, सिन्नर फाटा, दसक पंचक व नाशिक पश्चिम विभागात रामवाडी येथे हे अभियान सुरू आहे. दहाव्या दिवशी लसीकरणास आलेल्या चार सकारात्मक रुग्णांना शोधण्यात आले. या योगे लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर

हे वाचले का?  सप्तश्रृंग गड रस्त्यावरील खड्ड्यांमुळे भाविकांचे हाल

स्क्रिनिंग होणार असून त्यातून पॉझिटिव्ह रुग्णांना वेळेवर उपचार उपलब्ध होतील व गर्दीत होणारे संक्रमण थांबेल. तसेच उर्वरित नागरिकांच्या लसीकरण मोहिमेला बळकटी मिळणार आहे. लवकरच नाशिकच्या सहा विभागातील सर्व ३० लसीकरण केंद्रांजवळ हे अभियान सुरु होणार आहे.