नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात ‘ब्लॅक बीटर्न’ चे प्रथमच दर्शन

नेचर क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष प्रा.आनंद बोरा यांना हा पक्षी बघावयास मिळाला. महाराष्ट्रात हा पक्षी खूपच कमी प्रमाणात दिसतो.

पावसाळा असतानाही मुबलक खाद्य असल्याने अनेक पक्ष्यांचा मुक्काम

नाशिक : महाराष्ट्रातील पक्षीतीर्थ समजले जाणाऱ्या निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात पावसाळ्यात देखील आता नवीन पाहुण्यांचे आगमन होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. हिवाळ्यात या परिसरात तब्बल २६५ पेक्षा जास्त जातीचे पक्षी बघावयास मिळतात. परंतु, या वर्षी पावसाळा असतानाही अनेक पक्ष्यांनी मुबलक खाद्य असल्याने येथेच राहणे पसंद केले असून काही दिवसांपूर्वी दुर्मिळ ‘ब्लॅक बीटर्न’ (काळा तापस) हा पक्षी प्रथमच आढळून आला

नेचर क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष प्रा.आनंद बोरा यांना हा पक्षी बघावयास मिळाला. महाराष्ट्रात हा पक्षी खूपच कमी प्रमाणात दिसतो. पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंकापासून पूर्वेकडे चीन, इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया या भागात त्यांचा वावर दिसून येतो. ५८ सेंमी (२३ इंच) लांबीचा हा पक्षी  लांबलचक आणि लांब पिवळ्या रंगाची मान तसेच काळा रंग असे त्याचे वर्णन आहे.

हे वाचले का?  भुसावळ – सुरत रेल्वेसेवा विस्कळीत, चिंचपाडा स्थानकात रेल्वे रुळावर मातीचा भराव, मालवाहू गाडी रुतली

हे पक्षी झुडपांमध्ये घरटे करतात. मादी तीन ते पाच अंडी देते. किडे, मासे हे त्यांचे आवडते खाद्य आहे. व्हिक्टोरियन फ्लोरा आणि फौना गारंटी अ‍ॅक्ट (१९८८) अनुसार हा पक्षी धोका (दुर्मिळ) म्हणून सूचीबद्ध केला गेला आहे. मलेशियातील एक पक्षी भारतात मणिपूर येथे  सापडला असून मालदीवमध्ये एक भारतीय पक्षी सापडला होता. यामुळे त्यांचे स्थलांतर होत असल्याचे दिसून येते. नद्यांच्या वाढत्या खारटपणामुळे प्रजाती कमी झाल्याचे एका अभ्यासात पुढे आले आहे. नाशिक जिल्ह्यतील ही पहिली नोंद असून नांदुरमध्ये फक्त पावसाळ्यात पक्षी गणना न करता वन विभागाने वर्षभर करणे आवश्यक आहे. यामुळे १२ महिन्यातील पक्ष्यांचा अधिवास लक्षात येऊ शके ल, असे प्रा. बोरा यांनी नमूद के ले आहे. नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात पक्षीप्रेमी वर्षभर भेट देत असतात. नांदुरमध्यमेश्वर बंधाऱ्यामुळे होणाऱ्या पाणी फु गवटय़ात पक्ष्यांना आवश्यक असलेले खाद्य मिळत असल्याने या ठिकाणी वर्षभर वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांचे दर्शन होत असते. करोना महामारीमुळे मागील वर्षांपासून पर्यटकांसाठी अभयारण्यात प्रवेश बंद करण्यात आल्याने पक्ष्यांच्या संख्येत अधिक वाढ झाली असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पक्षीप्रेमींसाठी अभयारण्यात अधिक सुविधा करण्याची गरजही व्यक्त होत आहे. तसे के ल्यास येणाऱ्या पक्षीप्रेमींच्या संख्येत वाढ होऊ शके ल.

हे वाचले का?  सप्तश्रृंग गड रस्त्यावरील खड्ड्यांमुळे भाविकांचे हाल

नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात लाल आणि पिवळा बीटर्न दिसतात.पण ब्लॅक बीटर्नची नोंद नव्हती. तसेच तो महाराष्ट्रात देखील कमीच प्रमाणात दिसतो.पावसाळ्यात आलेल्या पक्ष्यांच्या नोंदी ठेवल्या जात नाही.यावर्षी धरणात आणि परिसरात बारा महिने पाणी होते. खाद्य मुबलक असल्याने पक्ष्यांचा किलबिलाट ऐकण्यास मिळत आहे.अनेक पक्ष्यांचा हा विणीचा हंगाम देखील आहे.त्यामुळे या परिसरात पक्ष्यांचा किलबिलाट वाढला आहे.

हे वाचले का?  भुसावळ – सुरत रेल्वेसेवा विस्कळीत, चिंचपाडा स्थानकात रेल्वे रुळावर मातीचा भराव, मालवाहू गाडी रुतली

 प्रा.आनंद बोरा (अध्यक्ष, नेचर क्लब ऑफ नाशिक)