नाशिक: परीक्षा कामकाजावर बहिष्कार, नंतर बेमुदत काम बंद; महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा इशारा

राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्नित अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्यांच्या मागण्यांसाठी परीक्षा कामकाजावर बहिष्कारचा निर्णय घेत आंदोलनाची घोषणा कृती समितीने केली.

महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय आणि महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली हं.प्रा.ठा. महाविद्यालयाच्या प्रांगणात आंदोलन करण्यात आले. परीक्षा कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण राज्यातील अकृषी विद्यापीठे व महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी २० फेब्रुवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलन करतील, असा इशाराही कृती समितीने दिला आहे.

हे वाचले का?   ‘नीट-यूजी’ परीक्षेत व्यवस्थेला खिंडार नाही ; सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्नित अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्यांच्या मागण्यांसाठी परीक्षा कामकाजावर बहिष्कारचा निर्णय घेत आंदोलनाची घोषणा कृती समितीने केली. हं.प्रा.ठा. महाविद्यालयातील ग्रंथालय सभागृहात कृती समितीच्या वतीने नियोजन सभा पार पडली. राज्यातील पदाधिकारी अजय देशमुख, प्रकाश पाटील, रावसाहेब त्रिभुवन, संदीप हिवरकर, विजयकुमार घरत, सुनील चिमूरकर व सचिन सुरवाडे, डॉ. मुरलीधर हेडाऊ यांच्या उपस्थितीत ही सभा झाली. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन वेगवेगळ्या टप्प्यात होणार आहे. दोन फेब्रुवारीपासून परीक्षा कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला. दुसरा टप्पा १४ फेब्रुवारी रोजी निदर्शनाचा असेल. १५ फेब्रुवारीला काळ्या फिती लावून कामकाज आणि १६ फेब्रुवारी रोजी एक दिवसीय संप पुकारला जाणार आहे.

हे वाचले का?  NEET UG परीक्षेचा सुधारित निकाल जाहीर; ‘असा’ पाहता येणार निकाल!

२० फेब्रुवारीपासून सर्व कृषी विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयात काम बंद आंदोलन छेडले जाणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. सभेनंतर कर्मचाऱ्यांनी प्रांगणात एकत्रित येऊन घोषणाबाजी केली. पुढील काळात बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा कृती समितीने दिला असल्याची माहिती जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे जिल्ह्याचे अध्यक्ष अनिल माळोदे, सहसचिव दिलीप बोंदर, दिलीप ठाकूर व गणेश आंदेवाड आदींनी दिला आहे.

हे वाचले का?  नाशिक : नाल्यामुळे हर्षवाडीतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान