नाशिक : प्रौढ साक्षरता परीक्षेपासून स्थलांतरामुळे अनेक जण वंचित

नाशिक जिल्ह्यात २०११ च्या नोंदीनुसार २५ हजारांहून अधिक निरक्षर आहेत. या निरक्षरांपैकी प्रौढ साक्षरता अभियानातंर्गत साक्षर होण्यासाठी धडपड करणाऱ्यांची शिक्षण विभागाच्या वतीने रविवारी परीक्षा घेण्यात आली.

नाशिक : नागरिकांना लिहिता वाचता यावे, खऱ्या अर्थाने लोक साक्षर व्हावेत, यासाठी राज्य शासनाने प्रौढ साक्षरता अभियानाच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. नाशिक जिल्ह्यात २०११ च्या नोंदीनुसार २५ हजारांहून अधिक निरक्षर आहेत. या निरक्षरांपैकी प्रौढ साक्षरता अभियानातंर्गत साक्षर होण्यासाठी धडपड करणाऱ्यांची शिक्षण विभागाच्या वतीने रविवारी परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यात ही परीक्षा देणाऱ्यांची संख्या ७१ टक्के राहिली. कामानिमित्ताने स्थलांतर करणारे अनेक जण ही परीक्षा देऊ शकले नाहीत.

हे वाचले का?  कमी बससंख्येमुळे पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंब