नाशिक : ब्रम्हगिरी परिसरातील बांधकामाविरुद्ध साधु-महंत आक्रमक; काम बंद पाडले

ब्रह्मगिरी हे वन संवर्धन राखीव घोषित झाले आहे. मात्र, या ठिकाणी बांधकाम व्यावसायिकांची मनमानी सुरू आहे.

ब्रह्मगिरी, गोदावरी, अहिल्या नदी परिसर पर्यावरणदृष्टीने संवेदनशील असतांना या भागात त्र्यंबक नगरपालिकेच्या वतीने बांधकाम सुरू करण्यात आल्याने मंगळवारी त्र्यंबकेश्वर येथील आखाड्यातील साधु, महंतांनी एकत्र येत काम बंद पाडले. या प्रकरणी त्र्यंबक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

हे वाचले का?  चार धरणे तुडुंब, नऊमध्ये ७५ टक्क्यांहून अधिक साठा, नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा ५७ टक्क्यांवर.

ब्रह्मगिरी पर्वत परिसरात अनेक बांधकामे सुरू आहेत. ब्रह्मगिरी हे वन संवर्धन राखीव घोषित झाले आहे. मात्र या ठिकाणी बांधकाम व्यावसायिकांची मनमानी सुरू आहे. याविरूध्द मंगळवारी त्र्यंबकेश्वर येथील आखाड्यातील सर्व साधु महंत एकत्र आले. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी समुहाने जात काम बंद करण्याची मागणी केली. मात्र काम सुरूच राहिल्याने ते काम थांबवित घोषणा दिल्या. पर्यावरणाला बाधा पोहचेल, अशी कुठलीच कृती सहन केली जाणार नाही, असा इशारा साधु- महंतानी दिला.

हे वाचले का?  पुरवठा विभागाचे कार्यालय अपंगांची नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर