पंजाब काँग्रेस अध्यक्ष पदासाठी नवज्योतसिंग सिद्धू यांच्या नावाची जोरदार चर्चा!

मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यावर नाराज असलेल्या सिद्धू यांनी दिल्लीवारी करत राहुल गांधी व प्रियंका गांधी यांची नुकतीच भेट घेतलेली आहे.

पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत कलहाच्या दरम्यान, आता आगामी काळातील विधानसभा निवडणुकी अगोदर मंत्रिमडळात व संघटनात्मक फेरबदलची तयारी सुरू झाल्याचे दिसत आहे. याचबरोबर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सुनील जाखड यांच्या जागी आता नवा चेहार आणला जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे या पदासाठी नवज्योसिंग सिद्धू यांचं नाव चर्चेत अधिक चर्चेत आहे.

हे वाचले का?  Jammu and Kashmir Exit Polls 2024: जम्मू-काश्मीरमध्ये भरघोस मतदान, आता सत्ता कुणाची? Exit Poll कधी येणार?

नवज्योसिंग सिद्धू आतापर्यंत सातत्याने मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या कार्यप्रणालीवर टीका करत आलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी दिल्लीवारी करत काँग्रेस नेते राहुल गांधी व सरचिटणीस प्रियंका गांधी यांची देखील भेट घेतलेली आहे. या भेटीनंतर पंजाब काँग्रेसमध्ये नवज्योसिंग सिद्धू यांना महत्त्वपूर्ण भूमिका मिळणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. तर, मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी प्रदेशाध्यक्ष हिंदू असायला हवा असं म्हणत, या पदासाठी हायकमांडकडे विजय सिंगला यांच्या नाव पुढे केल्याचेही समोर आले आहे.

हे वाचले का?  Aparajita Woman and Child Bill : बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास फाशी; पश्चिम बंगाल सरकारचं नवं विधेयक

यापुर्वी, पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत कलहाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी देखील आमदारांशी चर्चा केली होती. तसेच काँग्रेसमधील गटबाजी संपवण्याच्या उद्देशाने काँग्रेस समितीतर्फे स्थापन केली होती. तीन सदस्यांच्या समितीने अहवाल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे सुपूर्द केला आहे.