पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे लोकसभा निवडणूक लढवणार? माजी खासदार काकडे म्हणतात, “१०० टक्के… “

पंतप्रधान मोदी हे पुणे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा अचानक सुरू झाली आहे. खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा पोटनिवडणुकीचा पत्ता नसताना थेट २०२४ च्या पुणे लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे.

पंतप्रधान मोदी हे पुणे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा अचानक सुरू झाली आहे. खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा पोटनिवडणुकीचा पत्ता नसताना थेट २०२४ च्या पुणे लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. या आगामी निवडणुकीत पंतप्रधान मोदी हे भाजपाचे पुण्यातील उमेदवार असतील, यामुळे फक्त पुण्यात नाही तर राज्यात काय फरक पडेल वगैरे अशा चर्चांना धुमारे फुटले आहेत.

हे वाचले का?  Sujat Ambedkar on Raj Thackeray : “राज ठाकरेंचा भोंगा उतरवण्याचं काम…”, सुजात आंबेडकरांचं मोठं विधान; म्हणाले, “जोपर्यंत मुस्लिमांचे…”

असं असतानाच नेहमीच विविध व्यक्तव्यांमुळे चर्चेत रहाणारे माजी खासदार अंकुश काकडे यांनी थेट मोदी यांना पत्र लिहीत लोकसभा निवडणूक पुण्यातून लढवण्याची मागणी केली आहे. पुण्यात सुरू झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर हे पत्र मोदी यांना लिहिल्याचे त्यांनी स्पष्टही केलं आहे. ते पत्रात मोदींना विनंती करत म्हणतात, जेव्हा तुम्ही गुजरात आणि उत्तर प्रदेशमधून निवडणूक लढवली तेव्हा त्या राज्यात ९० ते १०० टक्के भाजपाला यश मिळाले. पुण्यात तुमचा विजय १०० टक्के असून राज्यातही ९० ते १०० टक्के भाजपाचे असेल.

हे वाचले का?  Maharashtra News Live: अक्षय शिंदेच्या वडिलांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू

सप्टेंबर महिन्यात मोदी सरकार यांनी लोकसभेचे विशेष अधिवेशन बोलवले आहे. एक देश एक निवडणुकीची चर्चा यामुळे सुरू झाली असून मुदत संपण्याआधी लोकसभा निवडणुका होतील अशीही चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आत्ताच संभाव्य लोकसभा उमेदवारांबद्दल चर्चा जोर धरू लागली आहे.

सुनील देवधर पुणे लोकसभा निवडणुक लढविण्यास इच्छुक असल्याची चर्चा

भाजपाचे नेते सुनील देवधर हे पुणे लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याची चर्चा काल सोशल मीडियावर रंगली होती. या चर्चेला काही तास होत नाही तोच पंतप्रधान मोदी हे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा अचानक सुरू झाली आहे.