पंतप्रधानांच्या हस्ते तुकोबांच्या शिळामंदिर लोकार्पणासाठी देहूत जय्यत तयारी

श्रीक्षेत्र देहूत जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या शिळामंदिराचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १४ जूनला देहूत येणार आहेत.

श्रीक्षेत्र देहूत जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या शिळामंदिराचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १४ जूनला देहूत येणार आहेत. त्या निमित्ताने मंदिरात आणि देहू परिसरात जय्यत तयारी सुरू आहे. २० जूनला तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून त्यापूर्वी पंतप्रधान देहूत येणार असल्याने वारकरी संप्रदायात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे वाचले का?  सर्वच गणेश मंडळांकडून ध्वनिप्रदूषण! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ देणार ‘एनजीटी’ला अहवाल

देहूतील मुख्य मंदिरामध्ये दगडात कोरीव काम करून साकारण्यात आलेल्या या शिळामंदिराची पायाभरणी प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असताना झाली होती. त्याचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते व्हावे, असा संस्थानचा आग्रह होता. त्यादृष्टीने २९ मार्च २०२२ रोजी पंतप्रधानांना निमंत्रण देण्यासाठी संस्थानचे विश्वस्त मंडळ दिल्लीत गेले होते. त्यानुसार या कार्यक्रमासाठी १४ जूनची तारीख निश्चित करण्यात आली होती.

हे वाचले का?  Ganesh Visarjan Procession : नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला उत्साहात प्रारंभ

कार्यक्रमाचा दिवस जवळ आल्याने देहूत देवस्थानकडून त्याची मोठ्या जोमाने तयारी सुरू आहे. मुख्य मंदिरातील काही कामे पूर्ण करण्यात येत असून, त्याची सजावटही करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठा सभामंडपही उभारण्यात आला आहे. पोलिसांसह जिल्हा प्रशासनही या कार्यक्रमासाठी सज्ज झाले आहे.