पावसाचा तडाखा

सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर वाढल्याने शहरासह ग्रामीण भागात पुराचा तडाखा बसून जनजीवन विस्कळीत झाले.

गोदावरी, कादवाला पूर, काही भागात दुकाने आणि घरांमध्ये पाणी

नाशिक : सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर वाढल्याने शहरासह ग्रामीण भागात पुराचा तडाखा बसून जनजीवन विस्कळीत झाले. ११ तालुक्यांतील ४३ मंडळात ६५ मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यामुळे १५ धरणांच्या विसर्गात वाढ करावी लागली. त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या गोदावरीला प्रथमच पूर आला. कादवा, दारणासह अनेक नद्या-नाले दुधडी भरून वाहत आहेत. पावसामुळे कुठेही मनुष्यहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. काही भागात दुकाने व घरांमध्ये पाणी शिरले. काही ठिकाणी जनावरे मृत्यमुखी पडली.

मंगळवारी रात्री जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. येवला, नांदगाव, मालेगाव, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी निफाड, बागणाल, सुरगाणा या तालुक्यातील काही मंडलात १३२ तर काही ठिकाणी ७० मिलीमीटर पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे धरणांच्या विसर्गात मोठी वाढ झाली. गंगापूर धरणातून १० हजारहून अधिक क्युसेकने विसर्ग करावा लागला. याचवेळी शहरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने गोदावरीच्या पात्रातून १३ हजारहून अधिक क्युसेकचा प्रवाह वाहत होता.

हे वाचले का?  नाशिक फाटा-खेड महामार्गासाठी ८ हजार कोटी; केंद्राकडून महत्त्वाकांक्षी ८ प्रकल्पांना मंजुरी  

काठालगतची मंदिरे पाण्याखाली बुडाली.  पाणी पातळी वाढू लागल्याने काठावरील नागरिकांना स्थलांतरीत होण्याचे आवाहन करण्यात आले. पुराचे पाणी वाढल्यास सराफ बाजार, दहीपूल आणि आसपासचा परिसर पाण्याखाली जातो. हे लक्षात घेऊन दुकानातील साहित्य सुरक्षित स्थळी नेण्यासाठी व्यावसायिकांची धावपळ उडाली. हंगामात गोदावरीने प्रथमच पूरपातळी गाठली.

ग्रामीण भागात पावसाने धुमाकूळ घातला. लासलगाव येथे रुग्णालयात पाणी शिरून डॉक्टर, रुग्ण, परिचारिका अडकून पडले होते. धरणांतून सोडलेल्या पाण्याने कमी उंचीचे पूल पाण्याखाली बुडाले. काही भागांशी संपर्क खंडित झाला. नदी, नाले काठालगतच्या तसेच सखल भागात काही घरे व दुकानांमध्ये पाणी शिरल्याची

हे वाचले का?  नाशिक: स्वस्त धान्य पुरवठ्यास तांत्रिक बिघाडाचा फटका

माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. इगतपुरी तालुक्यात पावसाबरोबर दाट प्रमाणात धुकेही आल्याने सर्वाधिक वर्दळीचा मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक मंदावली. देवळा तालुक्यातील

खर्डे परिसरातील निवाणे बारी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली.

पिकांचे मोठे नुकसान

अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. यात कपाशी, कांदा, मका, बाजरी मूग,  उडीद,  सोयाबीन पिकांचा समावेश आहे. अनेक भागात पिके पाण्याखाली गेली आहेत. मालेगावमध्ये कांदा रोपांचे नुकसान झाले. जून महिन्यात लागवड केलेला कापूस वेचणीला आला होता. पाण्याचे तो खराब झाला इगतपुरी, सुरगाणा तालुक्यात भात लागवड केलेल्या शेतीला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले  आहे.