पुण्यात अजित पवारांच्या हस्ते दुचाकींना ‘स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज’ या आशायाचे स्टीकर लावण्यात आले

पुण्यात अजित पवारांच्या हस्ते दुचाकींना ‘स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज’ या आशयाचे स्टीकर लावण्यात आले.

पुणे : हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, तर स्वराज्य रक्षक होते, असे विधान केल्यानंतर अजित पवार यांच्या विरोधात भाजपसह अनेक संघटना आक्रमक झाल्या आहेत. दरम्यान असे असताना पुण्यात अजित पवारांच्या हस्ते दुचाकींना ‘स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज’ या आशयाचे स्टीकर लावण्यात आले.

हे वाचले का?  Maharashtra News Live : “आचारसंहिता लागली, मनोज जरांगेंना आता निर्णय घ्यावा लागेल”, संभाजीराजे नेमकं काय म्हणाले?

अजित पवार यांचे पुणे शहराचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत केले. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन देखील केले. तसेच, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या आशायाचे स्टीकर अजित पवार यांच्या हस्ते अनेक दुचाकींना लावण्यात आले. यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली.