प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांचे पंतप्रधानांच्या हस्ते आज उद्घाटन

 महाराष्ट्रातील २८ हजार ग्रामपंचायतींमध्ये आजवर एकही कौशल्य विकास केंद्र नव्हते. पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेनुसार ही कौशल्य विकास केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र  ही संकल्पना राज्यातील तरुणांच्या रोजगार संधीसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारी असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी राज्यातील ५०० ग्रामपंचातींमध्ये ती सुरू करण्यात येणार आहेत, असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

हे वाचले का?  Sharad Pawar : राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण? शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “आमच्याकडून…”

 महाराष्ट्रातील २८ हजार ग्रामपंचायतींमध्ये आजवर एकही कौशल्य विकास केंद्र नव्हते. पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेनुसार ही कौशल्य विकास केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रोजगारासाठी तरुणांचे गावातून शहरात स्थलांतर होऊ नये, या दृष्टीने कौशल्य विकास केंद्राची ही संकल्पना महत्त्वाची असून भविष्यात राज्यातील या केंद्राची संख्याही वाढविण्यात येईल.

 हा कार्यक्रम राज्यस्तरावर होणार असल्याने त्यात उद्योग, महसूल, ग्रामविकास आणि महिला व बालविकास विभागाचाही सहभाग  आहे. ग्रामपंचायत, पंचायत, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार यांच्यासह आशा व अंगणवाडी सेविका आदींचा सहभाग कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटनात  आहे. विश्वकर्मा योजनेतील लाभार्थी  यांना कार्यक्रमात सहभागी करून घेण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत, असे लोढा यांनी सांगितले.

हे वाचले का?  Ravikant Tupkar : “…तर सत्ताधारी नेत्यांना फिरणं मुश्किल होईल”, रविकांत तुपकरांचा सरकारला पुन्हा इशारा